डिझेलवरील सरकारी नियंत्रण हटवले!

By admin | Published: October 18, 2014 08:21 PM2014-10-18T20:21:45+5:302014-10-18T20:21:45+5:30

शनिवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत डिझेलबाबत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. पेट्रोलप्रमाणे आता डिझेलवरील सरकारी नियंत्रण केंद्र सरकारने काढले.

Diesel Government Control Deletes! | डिझेलवरील सरकारी नियंत्रण हटवले!

डिझेलवरील सरकारी नियंत्रण हटवले!

Next
डिझेलचे दर ३.३७ रूपयांनी स्वस्त
ऑनलाइन लोकमत 
नवी दिल्ली, दि. १८ - शनिवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत डिझेलबाबत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. पेट्रोलप्रमाणे आता डिझेलवरील सरकारी नियंत्रण  केंद्र सरकारने काढले. या निर्णयामुळे सध्या तरी डिझेलच्या दरामध्ये लिटरमागे ३.३७ रूपयांनी घट झाली. 
पेट्रोलच्या दराप्रमाणे यापुढे डिझेलचे दर आंतरराष्ट्रीय तेल बाजाराच्या किमतींवर अवलंबून राहाणार असून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्या तेलाच्या किंमतीमध्ये वाढ झाल्यास त्याचा फटका ग्राहकांना बसणार आहे. डिझेलच्या नव्या किमती शनिवारी रात्रीपासून लागू करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे केंद्रसरकारला आता डिझेलवर कोणतेही अनुदान द्यावे लागणार नाही. एलपीजीच्या थेट अनुदान योजनामध्ये बदल करण्यात आला असून आधार कार्ड आणि बँक खात्यामधून अनुदान देण्यात येणार आहे. १० नोव्हेंबरपर्यंत या योजनेला मुर्त स्वरूप देण्यात येणार असल्याची माहिती अर्थमंत्री अरूण जेटली यांनी दिली. तसेच कॅबिनेट बैठकीत आणखी एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. नैसर्गीक वायूचे दर ठरवण्यासाठी दर सहामाही आढावा घेण्यात येणार आहे.

 

Web Title: Diesel Government Control Deletes!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.