८ गाड्यांमधील १००० लीटर डिझेल चोरी सीसीटीव्ही फुटेज तपासले : डिझेल चोरीमागे टोळी
By admin | Published: November 5, 2016 12:15 AM2016-11-05T00:15:04+5:302016-11-05T00:15:04+5:30
जळगाव : औद्योगिक वसाहतीमधील भारत गॅस गोदामानजीक गॅस सिलिंड घेण्यासंबंधी विविध भागातून आलेल्या आठ ट्रकमधून एक हजार लीटर डिझेलची चोरी झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या प्रकरणी औद्योगिक वसाहत पोलिसांनी गॅस गोदामानजीकच्या आस्थापनांच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली आहे.
Next
ज गाव : औद्योगिक वसाहतीमधील भारत गॅस गोदामानजीक गॅस सिलिंड घेण्यासंबंधी विविध भागातून आलेल्या आठ ट्रकमधून एक हजार लीटर डिझेलची चोरी झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या प्रकरणी औद्योगिक वसाहत पोलिसांनी गॅस गोदामानजीकच्या आस्थापनांच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली आहे. गॅस गोदामाशी संबंधितांना ट्रक रस्त्यावर न लावता वाहनतळ तयार करून ट्रकच्या सुरक्षेसाठी रक्षकाची नियुक्ती करण्याची सूचना पोलिसांनी दिल्याचे तपास पथकाकडून सांगण्यात आले. या प्रकरणात शहराबाहेरील टोळी असल्याचा संशय आहे. ही टोळी लहान आकारातील चारचाकी मालवाहून आणून त्यात टाक्या ठेवून डिझेल चोरून नेते. असेच प्रकार यापूर्वी अन्न महामंडळाचे गोदाम (एफसीआय), मोहाडी भागातील पेट्रोल पंप येथेही घडले आहेत. एफसीआय गोदामानजीक मालवाहू चारचाकी दिसून आली होती. परंतु चोरट्यांना कुणकुण लागल्याने ते लागलीच पसार झाले होते. या टोळीबाबत पोलिसांनी शोध घेण्यास सुरुवात केली आहे. या प्रकरणी ट्रकचालकांनी तक्रार अर्ज दिला असून, त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल होणार असल्याचे सांगण्यात आले. तपास पथकाने सीसीटीव्ही फुटेज तपासले, पण त्यात काहीही संशयास्पद आढळले नाही. त्यामुळे गुरुवारी रात्री झालेल्या चोरीसंबंधी अजून ठोस सुगावा प्राप्त झालेला नाही, असे तपास पथकाकडून सांगण्यात आले.