पाटण्यामध्येही डिझेल गाडयांवर बंदी

By admin | Published: December 24, 2015 03:11 PM2015-12-24T15:11:46+5:302015-12-24T15:11:46+5:30

डिझेल गाडया मोठया प्रमाणावर प्रदूषण करत असल्यामुळे आता दिल्ली पाठोपाठ बिहारची राजधानी पाटण्यामध्ये डिझेल गाडयांवर बंदी घालण्यात येणार आहे.

Diesel trains to be stopped in Patna | पाटण्यामध्येही डिझेल गाडयांवर बंदी

पाटण्यामध्येही डिझेल गाडयांवर बंदी

Next

ऑनलाइन लोकमत 

पाटणा, दि. २४ - डिझेल गाडया मोठया प्रमाणावर प्रदूषण करत असल्यामुळे आता दिल्ली पाठोपाठ बिहारची राजधानी पाटण्यामध्ये डिझेल गाडयांवर बंदी घालण्यात येणार आहे.  बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पंधरावर्ष जुन्या डिझेल गाडयांवर प्रतिबंध घालण्याचे निर्देश दिले आहेत. सध्या फक्त पाटण्यामध्ये मनाई करण्यात आली आहे. 

बुधवारी वन आणि पर्यावरण विभागाच्या बैठकी दरम्यान मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी हे निर्देश दिले. दिल्लीमध्येही येत्या एक जानेवारीपासून गाडया सम आणि विषम क्रमांकानुसार एकदिवसाआड रस्त्यावर धावणार आहेत. वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. 

Web Title: Diesel trains to be stopped in Patna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.