Difference Between VIP and VVIP: व्हीआयपी कोण आणि व्हीव्हीआयपी कोण? जाणून घ्या दोन्हींमधील फरक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2022 08:46 PM2022-02-14T20:46:34+5:302022-02-14T20:50:34+5:30

Difference Between VIP and VVIP: मंत्रालय़ाला वाटले तर ते कोणत्याही व्यक्तीला व्हीआयपीचा दर्जा देऊ शकते. या व्यक्तींसाठी व्हीआयपी गेट किंवा वेगळ्या दरवाज्याची व्यवस्था केलेली असते. तिथे ते खासगी गाडीने पोहोचू शकतात. तुम्हालाही हेवा वाटत असेल ना.

Difference Between VIP and VVIP: Who is VIP and who is VVIP? Know the difference between the two | Difference Between VIP and VVIP: व्हीआयपी कोण आणि व्हीव्हीआयपी कोण? जाणून घ्या दोन्हींमधील फरक

Difference Between VIP and VVIP: व्हीआयपी कोण आणि व्हीव्हीआयपी कोण? जाणून घ्या दोन्हींमधील फरक

googlenewsNext

लहानपणापासूनच आपण व्हीआयपी आणि व्हीव्हीआयपी हे दोन शब्द ऐकत असतो. अनेकदा कार्यक्रम किंवा मोठमोठ्या मंदिरांमध्ये व्हीआयपी एन्ट्री, व्हीआयपी सीट असतात. परंतू हे लोक कोण असतात, व्हीआयपी कोण आणि व्हीव्हीआयपी कोण कसे कळणार, चला जाणून घेऊयात या दोन्हींमधील फरक. 

व्हीआयपी (VIP)
व्हीआयपी म्हणजे व्हेरी इंम्पॉर्टंट पर्सन (Very Important Person) होय. हा शॉर्ट फ़ॉर्म अशा व्यक्तींसाठी वापरला जातो, ज्यांना चांगल्या सोई सुविधा प्रदान केल्या जातात तसेच त्यांना चांगली वागणूक दिली जाते. मंत्रालय़ाला वाटले तर ते कोणत्याही व्यक्तीला व्हीआयपीचा दर्जा देऊ शकते. या व्यक्तींसाठी व्हीआयपी गेट किंवा वेगळ्या दरवाज्याची व्यवस्था केलेली असते. तिथे ते खासगी गाडीने पोहोचू शकतात. 

VVIP (Very Very Important Person)
व्हीव्हीआयपी च्या नावातच सारे काही आले, जे लोक व्हीआयपीपेक्षाही उच्च दर्जाचे असतात त्यांना व्हीव्हीआयपी सेवा दिली जाते. व्हीव्हीआयपी म्हणजे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पर्संन होय. या लोकांची सुरक्षा अत्यंत कडक असते. त्यांना अगरक्षकही दिले जातात. एसपीजी, झेड आदी दर्जाची सुरक्षा या व्यक्तींना असते. 

व्हीव्हीआयपीमध्ये राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल, राज्यसभा, लोकसभा आणि विधानसभांचे अध्यक्ष, मुख्यमंत्री, मंत्री आदी येतात. सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीदेखील यात येतात.
तर अभिनेते, अभिनेत्री, राजकीय नेते, सरकारी अधिकारी, खेळाडू हे व्हीआयपीमध्ये येतात. तसे पहायला गेल्यास व्हीव्हीआयपी हे फक्त मोठ्या समारंभांनाच दिसतात. परंतू, छोट्य-मोठ्या समारंभांना, कार्यक्रमांना व्हीआयपी गेटच असतात. यामधूनच आमदार, खासदार, नगरसेवक, नगराध्यक्ष आदींना सोडले जाते किंवा बसण्यासाठी जागा ठेवलेली असते. पत्रकार, संपादक देखील व्हीआयपीमध्ये येतात.

Web Title: Difference Between VIP and VVIP: Who is VIP and who is VVIP? Know the difference between the two

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.