पत्नी व बहीणीत जो फरक तोच बोकड व गाईत - गिरीराजसिंह
By admin | Published: October 10, 2015 11:46 AM2015-10-10T11:46:39+5:302015-10-10T11:47:35+5:30
मांसाहारामधला फरक अधोरेखीत करताना गिरीराजसिंह म्हणाले, की पुरुषासाठी पत्नी व बहीण यांच्यामध्ये जसा फरक असतो, त्याचप्रकारे खाण्यासाठी बोकड व गाय यांच्यामध्ये फरक केला पाहिजे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १० - बीफवरून सर्वपक्षीय नेते उटपटांग वक्तव्ये करत असताना अशा वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या गिरीराजसिंह या केंद्रातील मंत्र्यांनी उडी घेत आपलीही भर टाकली आहे. मांसाहारामधला फरक अधोरेखीत करताना गिरीराजसिंह म्हणाले, की पुरुषासाठी पत्नी व बहीण यांच्यामध्ये जसा फरक असतो, त्याचप्रकारे खाण्यासाठी बोकड व गाय यांच्यामध्ये फरक केला पाहिजे.
आपल्या वक्तव्यावर तीव्र विरोध झाल्यानंतरही ठाम राहणा-या गिरीराजसिंहांनी आपल्या वक्तव्याचे समर्थन केले आहे.
विशेष म्हणजे दादरीमध्ये बीफच्या अफवेवरून एका मुस्लीमाची हत्या झाली, मैनपुरीमध्ये शेकडोंच्या जमावाने चुकीच्या माहितीच्या आधारे दोनजणांना बेदम मारहाण केली, अनेक नेत्यांनी उलटसुलट वक्तव्ये करत यात भर घातली आणि अखेर नरेंद्र मोदींनी राजकीय नेते उटपटांग वक्तव्ये करत असून माझ्यासह कुणाचंही ऐकू नका असं सांगताना फक्त प्रणब मुखर्जी यांचंच ऐका असंही सांगितलं. मात्र, हे सगळं पालथ्या घड्यावर पाणी असल्याचंच दिसून येत आहे.