'डिजिटल व्हिलेज'मधून 20 लाख रोजगारनिर्मिती; 1000 दिवसांत 4.5 लाख गावांत होणार कायापालट!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2020 07:21 PM2020-08-22T19:21:58+5:302020-08-22T19:40:46+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्टला घोषणा केली होती.

Digital Village will provide 20 lakh jobs in 1000 days; Maharashtra's village will be benefiting  | 'डिजिटल व्हिलेज'मधून 20 लाख रोजगारनिर्मिती; 1000 दिवसांत 4.5 लाख गावांत होणार कायापालट!

'डिजिटल व्हिलेज'मधून 20 लाख रोजगारनिर्मिती; 1000 दिवसांत 4.5 लाख गावांत होणार कायापालट!

Next

भारतात पुढील 1000 दिवसांत जवळपास 4.5 लाख गावांचं रुपडं पालटणार आहे. पुढील 1000 दिवसांनंतर या गावांतील युवकापासून ते महिलांपर्यंत अनेकांसाठी एक नवीन संधी चालून येणार आहे. डिजिटल व्हिलेज या योजनेतून जवळपास 20 लाख लोकांसाठी नवीन नोकरीची संधी निर्माण होणार आहे. विशेष बाब म्हणजे ही नोकरी गावातच उपलब्ध होणार आहे. त्यामुळे युवकांना आता नोकरीसाठी गाव सोडावं लागणार नाही. 

होऊन जाऊ दे; निरोपाचा सामना न खेळलेले खेळाडू विरुद्ध टीम इंडिया; इरफान पठाणची भन्नाट कल्पना

1000 दिवसांनंतर गावातील लोकांनाही कामासाठी शहरात जाऊन सरकारी कार्यालयाचे उंबरठे घासावे लागणार नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्टला घोषणा केली होती की, पुढील 1000 दिवसांत उर्वरित सर्व गावांत ऑप्टिकल फायबर केबल टाकण्याचं काम पूर्ण होणार आहे. आतापर्यंत 1.5 लाख गावांत ऑप्टिकल फायबर केबल टाकण्याचं काम पूर्ण झालं आहे. आता उर्वरीत 4.5 लाख गावांना ऑप्टिकल फायबर केबलशी जोडण्याचं काम सुरू आहे.

कसं बदलणार गावाचं चित्र ?
 

आयटी आणि इलेक्ट्रॉनिक्स मंत्रालयाच्या अत्यारिखाली काम करणाऱ्या कॉमन सर्व्हिस सेंटर ( सीएससी)चे मुख्य कार्यकारी अधिकारी दिनेश त्यागी यांनी सांगितले की,''या गावांमध्ये ऑप्टिकल फायबर आल्यानंतर प्रत्येक गावात एक-एक कॉमन सर्व्हिस सेंटर उघडण्यात येईल. या सेंटरमुळे गावातील कमीत कमी पाच जणांना नोकरी मिळेल आणि असाच हिशोब लावला, तर जवळपास 20 लाख लोकांना रोजगार मिळेल. सीएससीमध्ये शिक्षणासह उपचारापर्यंतच्या सुविधा गावकऱ्यांना मिळेल आणि त्यांना आता शहरात जावे लागणार नाही. प्रत्येक गावात एक-एक स्थानिक स्थरावर इंटरप्रेन्योरची निवड केली जाईल, जो शेतकऱ्यांचा शेतातला माल विकण्याची सोय करेल. बँकिंगची सुविधाही गावात निर्माण होईल. 

4.5 गावांपैकी महाराष्ट्रातील गावांची संख्या किती आहे, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पण, या योजनेनं महाराष्ट्रातील युवकांनाही संधी निर्माण होणार आहे. 

महत्त्वाचे मुद्दे

  • आतापर्यंत 796 गावं जलद इंटरनेटशी जोडली गेली आहेत
  • 103 गावांसह उत्तर प्रदेश अव्वल क्रमांकावर आहे
  • 53 गावांसह मध्यप्रदेश तिसऱ्या स्थानी आहे
  • 45-45 डिजिटल व्हिलेजसह महाराष्ट्र व छत्तीसगड तिसऱ्या क्रमांकावर आहेत
  • 39 आणि 27 गावांसह बिहार आणि झारखंड अनुक्रमे चौथ्या व पाचव्या स्थानावर आहेत.

 

अन्य महत्त्वाच्या बातम्या

IPL 2020 : RCBच्या खेळाडूंसोबत न जाता विराट कोहलीनं 'प्रायव्हेट' विमानानं घेतली दुबईसाठी भरारी

IPL 2020 : इंग्लंड, ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंसाठी नियमात सूट नाही; CSK, RR, KKR संघांना आलं टेंशन

Good News : लवकरच भारतात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परतणार; सौरव गांगुलीनं दिले मोठे अपडेट्स

IPL 2020 : महेंद्रसिंग धोनीचा नम्रपणा; स्वतःची बिझनेस क्लासची सीट दिली इकोनॉमी क्लासमधील प्रवाशाला

महेंद्रसिंग धोनीच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, BCCI आयोजित करणार निरोपाचा सामना; कधी व केव्हा?

 99वर असताना पंचांनी दिलं बाद, तरीही जोस बटलरनं झळकावलं शतक; पाहा नेमकं काय घडलं

Web Title: Digital Village will provide 20 lakh jobs in 1000 days; Maharashtra's village will be benefiting 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.