नोटाबंदीनंतर डिजिटल व्यवहारात 23 टक्क्यांनी वाढ
By admin | Published: July 16, 2017 08:01 PM2017-07-16T20:01:18+5:302017-07-16T20:28:23+5:30
नोटाबंदीनंतर अर्थव्यवस्थेत डिजिटल अर्थव्यवस्थेत काय काय बदल झाले आहेत? यावर संसदेच्या अर्थ खात्याच्या स्थायी समितीसमोर काही अधिकाऱ्यांनी आपले अहवाल सादर केले त्यात ही माहिती समोर आली आहे.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 16 : नोटाबंदीनंतर डेबिट आणि क्रेडिट कार्डच्या माध्यमातून होणाऱ्या व्यवहारात केवळ 7 टक्के तर एकूण डिजिटल व्यवहारात 23 टक्के वाढ झाली आहे. एका ज्येष्ठ सरकारी अधिकाऱ्याने संसदीय समितीला ही माहिती दिली आहे. डिजिटल व्यवहारात सर्वाधिक वाढ युनिफाईड पेमेंट इंटरफेसच्या (यूपीआय) माध्यमातून होणाऱ्या व्यवहारात झाली आहे.
नोटाबंदीनंतर अर्थव्यवस्थेत डिजिटल अर्थव्यवस्थेत काय काय बदल झाले आहेत? यावर संसदेच्या अर्थ खात्याच्या स्थायी समितीसमोर काही अधिकाऱ्यांनी आपले अहवाल सादर केले त्यात ही माहिती समोर आली आहे.
या माहितीनुसार सर्व प्रकारच्या डिजिटल व्यवहारात 23 टक्के वाढ झाली आहे. नोव्हेंबर2016 मध्ये हे व्यवहार 22.4 मिलियन होते. मे 2017 मध्ये ते 27.5 मिलियन झाले आहेत. युपीआयच्या माध्यमातून होणाऱ्या व्यवहारात सर्वाधिक वाढ झाली आहे. नोव्हेंबर2016 मध्ये ही वाढ प्रति दिवस एक मिलियन एवढी होती. मे 2017 मध्ये ही वाढ 30 मिलियन एवढी झाली आहे. नोटाबंदीच्या पूर्वी या व्यवहारांची संख्या 1.2 मिलियन होती. ती आता 2.2 मिलियन झाली आहे. डेबिट आणि क्रेडिट कार्डच्या माध्यमातून होणाऱ्या व्यवहारात मात्र केवळ 7 टक्के वाढ झाली आहे. नोव्हेंबर 2016 मध्ये हे व्यवहार 6.8 मिलियनचे होते. मे 2017 मध्ये प्लास्टिक कार्डच्या माध्यमातून होणारे व्यवहार 7.3 मिलियन एवढे झाले.
दरम्य़ान, 8 नोव्हेंबर 2016मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला होता. नोटाबंदी झाल्यानंतर भ्रष्टाचार दूर होईल आणि काळा पैसा बाहेर येईल असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं. तसंच पर्यायी नोटा म्हणून 500आणि 2 हजारांच्या नोटाही चलनात आणल्या गेल्या. तसंच डिजिटल व्यवहारांना प्राधान्य देऊन तशा प्रकारे व्यवहार करावेत असंही आवाहन करण्यात आलं. मात्र हे प्रमाण अपेक्षेप्रमाणे वाढलेलं नाही असंच समोर आलेल्या टक्केवारीवरून दिसतं आहे.