स्वप्नांना डिजिटल पंख!

By Admin | Published: July 2, 2015 04:19 AM2015-07-02T04:19:55+5:302015-07-02T04:19:55+5:30

बदलत्या काळात कोट्यवधी भारतीयांचे स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आखलेल्या ‘डिजिटल इंडिया’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथील भव्य समारंभात उद््घाटन केले.

Digital Wings to Dreams! | स्वप्नांना डिजिटल पंख!

स्वप्नांना डिजिटल पंख!

googlenewsNext

नवी दिल्ली : बदलत्या काळात कोट्यवधी भारतीयांचे स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आखलेल्या ‘डिजिटल इंडिया’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथील भव्य समारंभात उद््घाटन केले. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीतून साकारलेली डिजिटल शक्ती अवघे विश्व कवेत घेऊ पाहात असल्याच्या स्थितीचे भान दाखवत १८ लाखांना रोजगार देत तरुणाईच्या शक्तीला तंत्रज्ञानाच्या शक्तीशी जोडण्यासाठी या प्रकल्पाची आखणी करण्यात आली आहे. त्याला हातभार लावण्यासाठी देशातील उद्योग जगताने तब्बल साडेचार लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची तयारी दाखविली आहे. अनेक उद्योगपतींनी या चळवळीत आपणही पंतप्रधानांबरोबर असल्याचे आश्वासन दिले आहे.
भरगच्च गर्दीच्या साक्षीने इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये डिजिटल इंडियाच्या बोधचिन्हाचे दिमाखदार प्रकाशनही झाले. डिजिटल शक्तीला समजून घेणे आवश्यक असून, त्यातून कोट्यवधी भारतीयांची स्वप्ने पूर्ण होतील याची मला खात्री आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकल्पाविषयी भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, की ही काळाची गरज आहे. जर आपण या बदलाला समजून घेतले नाही तर जग दूर जाईल, आपण पाहात राहू.
या प्रकल्पाचा भाग म्हणून १ ते ७ जुलै हा डिजिटल सप्ताह म्हणून देशभरात साजरा होणार आहे. डिजिटल वीकची घोषणा लोकांमध्ये जागरूकता व सहभाग वाढविण्यासाठी आहे.

डिजिटल इंडियाची मुख्य उद्दिष्टे
-डिजिटल इंडियाचे मुख्य उद्दिष्ट भारतात क्रांती घडविण्याचे असून, भारताचा कायापालट डिजिटल क्षमता असणाऱ्या व अर्थकारणाची माहिती असणाऱ्या समाजात केला जाणार आहे. या एका योजनेअंतर्गत अनेक नव्या संकल्पना आहेत.
-भारतीय समाज अर्थकारणाची माहिती असणारा असावा, तसेच सरकारचे सुशासन प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचावे असे या योजनेचे उद्दिष्ट आहे.
-इलेक्ट्रॉनिक्स खाते व माहिती तंत्रज्ञान खाते यांनी एकत्रितपणे ही योजना तयार केली असून, केंद्र सरकारची अनेक खाती व राज्य सरकारांची मदत ही योजना तयार करण्यासाठी झालेली आहे. या योजनेवर नियंत्रण ठेवणाऱ्या समितीचे पंतप्रधान अध्यक्ष आहेत.

डिजिटल इंडिया म्हणजे जनतेला सेवा देण्यासाठी एक मोहीम आहे.
- अरु ण जेटली,
केंद्रीय अर्थमंत्री

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारतातील सर्वोत्कृष्ट आणि डिजिटल विश्वातील सर्वात लोकप्रिय व्यक्ती आहेत.
- अनिल अंबानी, उद्योगपती

डिजिटल इंडियातील पुढाकार देशाला अत्यल्प काळात बदलू शकतो.
-सुनील मित्तल, उद्योगपती

डिजिटल इंडियासाठी मोदी यांनी वैशिष्ट्यपूर्ण दृष्टी ठेवली आहे. आम्हाला या संस्मरणीय क्षणाचा अभिमान आहे.
-कुमार मंगलम बिर्ला, उद्योगपती

नागरिकांना तंत्रज्ञानाने सुसज्ज करण्यासाठी हे एक पहिले सक्षम पाऊल आहे.- अझीम प्रेमजी, उद्योगपती

आम्ही ज्ञानाधिष्ठित समाजनिर्मिती करीत आहोत.
- सायरस मिस्त्री, टाटा समूहाचे अध्यक्ष

Web Title: Digital Wings to Dreams!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.