दिग्विजय सिंह - अमृता रायचे शुभमंगल
By Admin | Published: September 6, 2015 12:53 PM2015-09-06T12:53:06+5:302015-09-06T12:53:06+5:30
काँग्रेसचे महासचिव दिग्विजय सिंह व पत्रकार अमृता राय हे दिल्लीत एका छोटेखानी समारंभात विवाहबद्ध झाले आहेत.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ६ - काँग्रेसचे महासचिव दिग्विजय सिंह व पत्रकार अमृता राय हे दिल्लीत एका छोटेखानी समारंभात विवाहबद्ध झाले आहेत. अमृता राय यांनी स्वतः याची घोषणा केली असून दिग्विजय सिंह यांनी संपत्ती त्यांचा मुलगा व मुलीच्या नावाने करावी असेही राय यांनी म्हटले आहे.
गेल्या वर्षी दिग्विजय सिंह व अमृता राय यांचे काही छायाचित्र सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याने या दोघांनाही प्रेमसंबंधांची कबुली दिली द्यावी लागली. ६८ वर्षीय दिग्विजय सिंह यांनी ४४ वर्षाच्या अमृता रायशी लग्न केले असून दिल्लीत अत्यंत साधेपणाने हा लग्न सोहळा पार पडला. हिंदूपद्धतीने लग्न केल्यावर या दोघांनाही लग्नाची नोंदणीदेखील केली आहे. अमृता राय यांनी फेसबुकवर यासंदर्भात माहिती दिली आहे. 'मी दिग्विजय सिंह यांच्याशी प्रेमाखातर लग्न केले आहे, मला त्यांची संपत्ती नकोय, त्यांनी त्यांची संपत्ती मुलगा व मुलीच्या नावाने करावी अशी विनंतीही दिग्विजय सिंह यांना केल्याचे अमृता राय यांनी सांगितले. मी माझ्या पतीसोबत घटस्फोट घेतला व त्यानंतरच मी दिग्विजय सिंह यांच्याशी लग्न केले असेही राय यांनी स्पष्ट केले. मात्र या दोघांचा विवाह कुठे झाला व या विवाह समारंभाला कोण कोण उपस्थित होते हे मात्र समजू शकलेले नाही.