हेमंत करकरे हे प्रामाणिक अधिकारी होते - दिग्विजय सिंह
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2019 03:49 PM2019-04-19T15:49:46+5:302019-04-19T16:08:30+5:30
हेमंत करकरे हे प्रामाणिक आणि कटीबद्ध अधिकारी होते.
नवी दिल्ली : भाजपाच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहीद हेमंत करकरे यांच्याबाबत वादग्रस्त विधान केलं आहे. याविषयी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
निवडणुकीच्या काळात लष्कर आणि शहीद जवानांबद्दल कोणतीही टिप्पणी करु नये, असे निवडणूक आयोगानं सांगितलं आहे. हेमंत करकरे हे प्रामाणिक आणि कटीबद्ध अधिकारी होते. मुंबई दशतवादी हल्ल्यात लोकांना वाचवताना ते शहीद झाले, असे दिग्विजय सिंह यांनी म्हटले आहे.
Digvijaya Singh on Pragya Thakur's comment on Mumbai ATS chief late Hemant Karkare: EC has clearly said that no political comments should be made on Army&martyrs. Hemant Karkare ji was an honest&committed officer who attained martyrdom for the people of Mumbai in a terror attack. pic.twitter.com/kJCz2p42b2
— ANI (@ANI) April 19, 2019
भाजपाच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहीद हेमंत करकरे यांच्याबाबत वादग्रस्त विधान केलं आहे. "हेमंत करकरेंनी मला चुकीच्या पद्धतीनं अडकवलं, त्यांना सांगितलं होतं की, तुमचा सर्वनाश होईल, त्यांचा स्वत:च्या कर्मानेच मृत्यू झाला," असं धक्कादायक विधान साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी केलं आहे.
भाजपाकडून मध्य प्रदेशातील भोपाळ मतदार संघासाठी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी उमेदवारी देण्यात आली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर गुरुवारी पहिल्यांदा साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर माध्यमांसमोर आल्या होत्या. त्यानंतर आता त्यांनी शहीद हेमंत करकरे यांच्याबद्दल असं वादग्रस्त विधान करुन खळबळ उडवून दिली आहे.
साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर काय म्हणाल्या, वाचा त्यांच्याच भाषेत.....
"वो जांच अधिकारी सुरक्षा आयोग का सदस्य था, उन्होंने हेमंत करकरे को बुलाया और कहा कि साध्वी को छोड़ दो. लेकिन हेमंत करकरे ने कहा कि मैं कुछ भी करूंगा लेकिन सबूत लाउंगा और साध्वी को नहीं छोड़ूंगा."
"ये उसकी कुटिलता था ये देशद्रोह था धर्मविरुद्ध था, वो मुझसे पूछता था कि क्या मुझे सच के लिए भगवान के पास जाना होगा, तो मैंने कहा था कि आपको जरूरत है तो जाइए."
"मैंने उसे कहा था तेरा सर्वनाश होगा, उसने मुझे गालियां दी थीं. जिसदिन मैं गई तो उसके यहां सूतक लगा था और जब उसे आतंकियों ने मारा तो सूतक खत्म हुआ."
#WATCH Pragya Singh Thakur:Maine kaha tera (Mumbai ATS chief late Hemant Karkare) sarvanash hoga.Theek sava mahine mein sutak lagta hai. Jis din main gayi thi us din iske sutak lag gaya tha.Aur theek sava mahine mein jis din atankwadiyon ne isko maara, us din uska anth hua (18.4) pic.twitter.com/COqhEW2Bnc
— ANI (@ANI) April 19, 2019
दरम्यान, मध्य प्रदेशातील भोपाळ लोकसभा मतदार संघातून काँग्रेसचे उमेदवार दिग्विजय सिंह यांच्याविरोधात साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. भाजपाकडून दोनदिवसांपूर्वी मध्यप्रदेशातील उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. यावेळी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना भोपाळ मतदार संघातून उमेदवारी देण्यात आली आहे.
भोपाळ मतदार संघ भाजपाचा बालेकिल्ला आहे. या मतदार संघात 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा उमेदवार आलोक सांजर यांनी 7.14 लाखाहून अधिक मताधिक्याने विजयी झाले होते. तर त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे उमेदवार पी.सी.शर्मा यांनी 3.43 लाख मतं मिळाली होती. मात्र, यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसकडून भोपाळ मतदार संघातून दिग्विजय सिंह यांनी मैदानात उतरविण्यात आले आहे. तर, भाजपाकडून साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.