राम मंदिराच्या भूमिपूजनाचा मुहूर्त योग्य आहे का?, उमा भारतींना दिग्विजय सिंहांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2020 05:00 PM2020-08-03T17:00:34+5:302020-08-03T17:09:34+5:30
राम मंदिराचे भूमिपूजन राजीव गांधी यांनी आधीच केले आहे, असेही दिग्विजय सिंह यांनी सांगितले.
नवी दिल्ली : अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत येत्या ५ ऑगस्टला राम मंदिराचा भूमिपूजन सोहळा होणार आहे. त्यावरून काँग्रेस आणि भाजपाच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहे. सोमवारी काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी ट्विटर आणि पत्रकार परिषदेत भाजपावर निशाणा साधला.
भगवान राम मंदिरावरून शेकडो वर्षांपर्यंत वाद राहिला आहे. याला राजकीय स्वरूप दिले जात असून यावर माझा आक्षेप आहे, असे दिग्विजय म्हणाले. तसेच, ज्यावेळी संपूर्ण देशात ही परंपरा चालत आहे की प्रत्येक शुभ कामात मुहूर्त पाहिला जातो. चातुर्मास चालू आहे आणि भादो आहे, मग ५ ऑगस्ट रोजी भूमिपूजन का होत आहे, असा सवाल दिग्विजय सिंह यांनी केला आहे.
दिग्विजय सिंह यांनी भाजपाच्या नेत्या उमा भारती यांच्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले, "राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याला उमा भारती का जात नाहीत? मी त्यांना विचारतो की मुहूर्त योग्य आहे का? संतांनी बोलले पाहिजे, पण यावेळी त्यांचे मौन का आहे? मी म्हणतो की, यावर चर्चा झाली पाहिजे. " याचबरोबर, राम मंदिराचे भूमिपूजन राजीव गांधी यांनी आधीच केले आहे, असेही दिग्विजय सिंह यांनी सांगितले.
याचबरोबर, दिग्विजय सिंह यांनी ट्विट करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे राम मंदिराच्या भूमिपूजनाचा सोहळा पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. राम मंदिर भूमिपूजनाच्या कार्यक्रमावरुन त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका केली आहे. दिग्विजय सिंह म्हणाले, "अशुभ मुहुर्तावर राम मंदिराचे भूमिपूजन करुन मोदीजी तुम्ही अजून किती लोकांना रुग्णालयात पाठवणार आहात? योगीजी आत तुम्हीच मोदींना समजावा, तुम्ही असताना सनातन धर्माच्या सर्व मर्यादा का तोडल्या जात आहेत? तुमची अशी काय अडचण आहे, की, तुम्ही हे सर्व होऊ देत आहात?”
आणखी बातम्या....
'अजितदादांना मुख्यमंत्री म्हणून पाहायचे आहे'; रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीनं व्यक्त केली इच्छा
भारताविरोधात चीनचा नवा डाव, नेपाळला मोहरा बनवून 'या' प्रकल्पाच्या कामाला केली सुरुवात
Sushant Singh Rajput death case: "मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बॉलिवूड माफियांच्या दबावाखाली"
दिग्गजांचे ट्विटर अकाउंट्स हॅक करणाऱ्या १७ वर्षीय मुलानं एका दिवसांत कमावले १ लाख डॉलर
Article 370: ...म्हणून 5 ऑगस्ट हा आमच्यासाठी ऐतिहासिक नव्हे, काळा दिवस; मुफ्तींच्या लेकीची टीका
लवकरच सात नवीन Bullet Trains सुरू होणार; कोणत्या शहरांमध्ये धावणार, जाणून घ्या...