दिनेश पाटलांच्या पत्नीसह नातेवाईकांचे जबाब नोंदवले

By admin | Published: February 29, 2016 10:03 PM2016-02-29T22:03:03+5:302016-02-29T22:03:03+5:30

जळगाव : पिंपळगाव बुद्रूक, ता.भुसावळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ.दिनेश अमृत पाटील (२८, रा.हरेश्वरनगर, जळगाव) यांच्या आत्महत्या प्रकरणात जिल्हापेठ पोलिसांनी त्यांच्या नातेवाईकांचे जाबजबाब नोंदवले आहेत. जबाब देणार्‍या नातेवाईकांनी; आरोपींकडून देण्यात येणार्‍या मानसिक त्रासाला कंटाळूनच दिनेश पाटील यांनी आत्महत्या केल्याचेच म्हटले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली.

Dinesh Patil's wife and relatives recorded their responses | दिनेश पाटलांच्या पत्नीसह नातेवाईकांचे जबाब नोंदवले

दिनेश पाटलांच्या पत्नीसह नातेवाईकांचे जबाब नोंदवले

Next
गाव : पिंपळगाव बुद्रूक, ता.भुसावळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ.दिनेश अमृत पाटील (२८, रा.हरेश्वरनगर, जळगाव) यांच्या आत्महत्या प्रकरणात जिल्हापेठ पोलिसांनी त्यांच्या नातेवाईकांचे जाबजबाब नोंदवले आहेत. जबाब देणार्‍या नातेवाईकांनी; आरोपींकडून देण्यात येणार्‍या मानसिक त्रासाला कंटाळूनच दिनेश पाटील यांनी आत्महत्या केल्याचेच म्हटले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली.
डॉ.दिनेश पाटील यांनी सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून १८ ते १९ नोव्हेंबर २०१५ दरम्यान, आत्महत्या केली होती. याप्रकरणी त्यांचे मेहुणे ईश्वर भागवत पवार (रा.श्रीरामनगर, भुसावळ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जि.प. सदस्य संजय पाटील (रा.दर्यापूर, ता.भुसावळ), नितीन निवृत्ती माळी (रा.वरणगाव), अविनाश सुरेश चौधरी (रा.पिंपळगाव बुद्रूक) व सुपडू उखा पाटील (रा.पिंपळगाव बुद्रूक) यांच्याविरुद्ध जिल्हापेठ पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. या गुन्‘ात अविनाश चौधरी याला २१ नोव्हेंबर २०१५ रोजी अटक झाली होती. त्यानंतर वरणगाव नगरपरिषदेचे नगरसेवक नितीन उर्फ बबलू निवृत्ती माळी व जि.प. सदस्य संजय पाटील यांनाही जिल्हापेठ पोलिसांनी अटक केली. सध्या आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. या प्रकरणात आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र तयार करण्याचे काम सुरू असून लवकरच ते न्यायालयात दाखल करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली.

Web Title: Dinesh Patil's wife and relatives recorded their responses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.