डिप्पी वांकाणींची बातमी

By admin | Published: July 31, 2015 10:25 PM2015-07-31T22:25:19+5:302015-07-31T22:25:19+5:30

डॉक्टर्स, वकील, अभियंतेही बनले पोलिसांचे खबरे

Dipi Vacancy News | डिप्पी वांकाणींची बातमी

डिप्पी वांकाणींची बातमी

Next
क्टर्स, वकील, अभियंतेही बनले पोलिसांचे खबरे
--------------
डिप्पी वांकाणी
मुंबई : महाराष्ट्रात पोलिसांना दहशतवादाशी संबंधित गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी आवश्यक अशी महत्वाची गुप्त माहिती मिळण्याचे स्त्रोत आता डॉक्टर्स, वकील, अभियंते आणि विद्यार्थीही विकसित झाले आहेत. प्रत्येक पोलीस अधिकार्‍याचा स्वत:चा असा माहिती मिळविण्याचा मार्ग म्हणजेच पारंपरिक खबर्‍यांचे जाळे असते व त्यामुळे गुन्ह्यांचा तपास करायला व ते सोडवायला मदत होते. आता खबर्‍यांचा नवा वर्ग आधुनिक सायबर गुन्हे तपासायला पोलिसांची मदत करीत आहे. गेल्या पंधरवड्यात याकूब मेमन फाशी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांना कायदा आणि सुव्यवस्था कायम राखण्याच्या कामात या नव्या माहिती स्त्रोतांनी मोठी मदत केली. त्यांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी अनेक पोस्ट ऑनलाईन मिडियावरून डिलीट केल्या.
बुटांना पॉलीश करणारा, हॉटेलमधील वेटर किंवा मेकॅनिक यांच्याकडून मिळालेली माहिती पोलिसांना गुन्ह्यांतील संशयित पकडणे किंवा मुद्देमाल जप्त करण्याच्या कामात किती महत्वाची ठरते हे आपण अनेक लोकप्रिय हिंदी चित्रपटांत बघितलेले असते. प्रत्येक पोलीस अधिकार्‍याचा अशी गुप्त माहिती मिळविण्याचा स्त्रोत (मानवी खबरे) असतोच. त्यातून गुन्ह्यांची उकल व्हायला मदत मिळते. या खबर्‍यांनी दिलेली माहिती गुन्ह्याचा तपास करण्यासाठी किती महत्वाची आहे, संशयिताला किंवा गुन्हेगाराला अटक झाली का किंवा किती मुद्देमाल जप्त झाला यावरून त्यांना मोबदला दिला जातो. आता आम्ही अशी गुप्त माहिती मिळविण्यासाठी नवे स्त्रोत विकसित केले आहेत. ही मंडळी समाजातील उच्चभ्रू वर्गांचे प्रतिनिधित्व करीत असून गुन्ह्यांचा विषय बघता त्यांची माहिती खूप संवेदनशीलही असते, असे भारतीय पोलीस सेवेतील वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले.
ही माहिती देणारे स्त्रोत हे पैशांसाठी हे काम करीत नसून त्यांना आपण समाजाचे काही देणे लागतो, असे वाटते. मागे एखाद्या टिष्ट्वटमुळे किंवा एखाद्या फेसबुकमुळे राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याची उदाहरणे घडली आहेत. त्यामुळे आता केवळ पहारा आणि बंदोबस्त केवळ जमिनीवरच उपयोगाचा नाही तर सायबर जगातही लक्ष द्यावे लागेल. इंटरनेटवर २४ तास लक्ष देणारी आमची तज्ज्ञांची शाखा असून तज्ज्ञ खबर्‍यांनी दिलेली माहिती अनेक वेळा उपयोगाची ठरली आहे. आमची यंत्रणा याकूब मेमन प्रकरणातसुद्धा यामुळे सावध व सक्रिय होती, असे हा अधिकारी म्हणाला.
हा अधिकारी म्हणाला की, एक नागरिक या नात्याने आपली जबाबदारी काय याची जाणीव करून देण्यासाठी आम्ही नियमितपणेशाळा, महाविद्यालये आणि कंपन्यांमध्ये कार्यशाळा घेत असतो. अशा कार्यशाळांमध्येज्यांनी रस घेतला ते आम्हाला नियमितपणे माहिती पुरवत असतात, असा आमचा अनुभव आहे, असे तो म्हणाला.

Web Title: Dipi Vacancy News

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.