अयोध्येत ५ ऑगस्टला होणार दीपोत्सव

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2020 04:48 AM2020-07-31T04:48:00+5:302020-07-31T04:48:22+5:30

घरोघरी दिवे लागणार : राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही कंबर कसली; मंत्रोच्चार, भजन, पूजापाठ होणार

Dipotsav to be held on 5th August in Ayodhya | अयोध्येत ५ ऑगस्टला होणार दीपोत्सव

अयोध्येत ५ ऑगस्टला होणार दीपोत्सव

Next

त्रियुग नारायण तिवारी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम ऐतिहासिक करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने याची जबाबदारी पेलली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत ५ आॅगस्ट रोजी होणाऱ्या या कार्यक्रमात अयोध्येच्या परिसरात घराघरांत दीपोत्सव व मंत्रोच्चार, भजन, पूजापाठ होणार आहे.


याबाबत अयोध्येत एक बैठक झाली. भाजप, विश्व हिंदू परिषद, विद्यार्थी परिषद, विद्याभारती, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्यासह क्षेत्रीय प्रचारक आदींची उपस्थिती होती. यावेळी क्षेत्रीय प्रचारकांनी सर्वांना जबाबदारी सोपविली. तसेच, सर्वांना आवाहन केले की, अयोध्या धामच्या सर्व मार्गांवर आणि घरी भगवे ध्वज फडकाविण्याची व्यवस्था करण्यात यावी. अयोध्येलगतच्या गोंडा, बस्ती, सुल्तानपूर, बाराबांकी जिल्ह्यांत घरोघरी भूमिपूजनावेळी पूजापाठ आणि दीपोत्सवाचे वातावरण तयार करा.

सर्वत्र लगबग
च्पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा प्रशासनही कामाला लागलेले आहे. अनेक कर्मचारी रस्त्यांवर उतरले आहेत. ठिकठिकाणी कामे सुरू आहेत.
च्रंगरंगोटी आणि रस्त्यांची कामे सुरू आहेत. हेलिपॅडपासून ते राम जन्मभूमी गेटपर्यंत दोन्ही बाजूंनी दुकानांना पिवळा रंग देण्यात आला आहे. संपूर्ण मार्गावर रोषणाई करण्यात आली आहे.
च्पंतप्रधान मोदी यांच्या प्रस्तावित मार्गावरील अतिक्रमणे, झोपड्या हटविण्यात येत आहेत. प्रशासकीय आणि पोलीस अधिकाऱ्यांची प्रचंड धावपळ सुरू आहे. स्वागत कार्यासाठी हजारो कामगार काम करीत आहेत. अयोध्येत आता न्यूज चॅनलच्या व्हॅन दिसू लागल्या आहेत.

लोकांनी घरीच
पूजा करण्याचे आवाहन

राममंदिराच्या भूमिपूजनाच्या वेळी म्हणजेच ५ आॅगस्ट रोजी सकाळी ११.३० ते १२.३० या वेळेत देशभरातील संतांनी आपापल्या जवळची मंदिरे व मठांमध्ये पूजा करावी. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर अयोध्येत कोणीही येण्याचा प्रयत्न करू नये.
लोकांनी या कार्यक्रमाचे टीव्हीवर थेट प्रक्षेपण पाहावे व आपापल्या घरी सर्वांनी दिवे लावावेत, असे आवाहन श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपतराय यांनी केले आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मागील आठवड्यात राम जन्मभूमी मंदिराच्या ठिकाणी भेट देऊन तयारीचा आढावा घेतला.

पुजारी, १५ पोलिसांना कोरोना
च्अयोध्या : अयोध्येतील पुजारी प्रदीप दास आणि रामजन्मभूमी मंदिराच्या ठिकाणी तैनात असलेल्या १५ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे.
च्तथापि, भूमिपूजनाच्या दिवशी पूजा करण्यासाठी वाराणसी व अयोध्येचे ११ पुजारी उपस्थित राहणार असून, त्यात कोरोनाची लागण झालेले प्रदीप दास यांचा समावेश नाही, असे सूत्रांनी सांगितले.
च्येत्या पाच आॅगस्ट रोजी अयोध्येत राममंदिराचे भूमिपूजन होणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे यावेळी उपस्थित राहणार आहेत. भूमिपूजनासाठी जय्यत तयारी सुरू आहे.
च्रामजन्मभूमी ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्यगोपाल दास यांचे प्रस्तावित वारसदार महंत कमल नयन दास यांनी सांगितले की, मंदिराच्या ठिकाणी दररोज पूजा करणारे एक पुजारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. मात्र, यामुळे घाबरून जाण्याचे काहीही कारण नाही. पूजेसाठी निश्चित करण्यात आलेला परिसर ट्रस्टतर्फे दररोज सॅनिटाईज केला जात आहे.
च्भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी सुमारे २०० मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे. यात विविध राज्यांतील सर्व मुख्यमंत्र्यांचा समावेश आहे, अशी माहिती ट्रस्टचे खजिनदार स्वामी गोविंद देव गिरी यांनी दिली.
च्रामजन्मभूमी अंदोलनातील अग्रणी नेते लालकृष्ण अडवाणी आणि इतर नेत्यांनाही यावेळी बोलावण्यात येणार आहे, असे ट्रस्टच्या एका सदस्याने सांगितले.

Web Title: Dipotsav to be held on 5th August in Ayodhya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.