संबित पात्रांकडून मोदी-योगींची तुलना थेट शिवाजी महाराज अन् महाराणा प्रतापांसोबत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2021 04:51 PM2021-12-24T16:51:37+5:302021-12-24T18:07:20+5:30
मी तर त्या पोलीसवाल्यांना सांगू इच्छितो की, कायम योगीच मुख्यमंत्री राहणार नाहीत, किंवा मोदीच पंतप्रधान बनणार नाहीत. आम्ही मुसलमान वेळ पाहून शांत आहोत, पण आम्ही तुमच्या अत्याचाराला विसणार नाही.
नवी दिल्ली - एमआयएमचे प्रमुख असुदुद्दीन औवेसींचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत औवेसींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर जोरदार टीका केली. तसेच, पोलिसांना उद्देशून धमकीवजा इशाराच दिल्याचे दिसत आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर औवेसींनीही आपला फोकस युपीकडे वळवल्याचे दिसून येते.
मी तर त्या पोलीसवाल्यांना सांगू इच्छितो की, कायम योगीच मुख्यमंत्री राहणार नाहीत, किंवा मोदीच पंतप्रधान बनणार नाहीत. आम्ही मुसलमान वेळ पाहून शांत आहोत, पण आम्ही तुमच्या अत्याचाराला विसणार नाही. अल्लाह.. आपल्या ताकदीने तुम्हाला नेस्तनाबूद करेल आणि आम्ही हेच लक्षात ठेवू. जेव्हा वेळ बदलेल तेव्हा तुम्हाला वाचवायला कोण येईल? जेव्हा योगी आपल्या मठात जातील अन् मोदी डोंगरात निघून जातील, तेव्हा कोण येईल? आम्ही तेव्हा विसरणार नाही, असा धमकीवजा इशाराच औवेसींनी दिला आहे.
किसे धमका रहे हो मियां?
— Sambit Patra (@sambitswaraj) December 23, 2021
याद रखना जब-जब इस वीर भूमि पर कोई औरंगजेब और बाबर आएगा तब-तब इस मातृभूमि की कोख से कोई ना कोई वीर शिवाजी, महाराणा प्रताप और मोदी-योगी बन खड़ा हो जाएगा।
सुनों हम ना डरे थे मुगलों से ना जिन्नावादियों से तो तुमसे क्या खाक डरेंगे! pic.twitter.com/cvbBjqJe53
खासदार औवेसींच्या या व्हिडिओवरुन भाजप नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच, या व्हिडिओला शेअर करत भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ता संबित पात्रा यांनीही औवेसींनी प्रत्युत्तर दिलंय. किसे धमका रहे हो मियाँ? असा सवाल संबित पात्रा यांनी विचारला आहे. मात्र, औवेसींनी प्रत्युत्तर देताना, संबित पात्रा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची तुलना शिवाजी महाराज व महाराणा प्रताप यांच्यासमवेत केली आहे.
सुनों हम ना डरे थे मुगलों से ना जिन्नावादियों से तो तुमसे क्या खाक डरेंगे!. जेव्हा जेव्हा या वीर भूमीवर औरंगजेब आणि बाबर चालून येईल, तेव्हा मातृभूमीतून वीर शिवाजी आणि महाराणा प्रताप जन्म घेईन, असे प्रत्युत्तर संबित पात्रा यांनी दिले आहे. दरम्यान, औवेसी यांनी 12 डिसेंबर रोजी कानपूर येथील एका जनसभेला संबोधित करताना आक्रमक भाषण केले होते. त्यावेळी, त्यांनी पोलीसांना धमकीवजा इशाराच दिला होता. त्यांचा हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.