PM Narendra Modi Interview: सर्जिकल स्ट्राईकवेळी थेट संपर्कात होतो; पण... मोदी यांची पहिल्यांदाच कबुली
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2019 07:33 PM2019-01-01T19:33:46+5:302019-01-01T19:51:00+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच केला खुलासा.
नवी दिल्ली : सर्जिकल स्ट्राईकझाल्यानंतर संरक्षण दलाच्या प्रमुखांनी आधी पाकिस्तानला याबाबत कळविले, नंतर प्रसारमाध्यमे, देशाला सांगितले. मात्र, यावर नाही सरकारचा कोणता मंत्री बोलला होता नाही पंतप्रधान. मात्र, त्याच दिवशी विरोधी पक्षांनी या स्ट्राईकवर संशय व्यक्त केला. आणि त्यांच्या आरोपांना वजन आणण्यासाठी पाकिस्तानच्या वक्तव्यांची मदत घेतली होती. तेच पाकिस्तानला हवे होते. या ऑपरेशनवेळी मी थेट संपर्कात होतो, असा खुलासा पहिल्यांदाच मोदी यांनी केला.
सर्जिकल स्ट्राईकच्या राजकीय मुद्द्यावर मोदी यांना प्रश्न विचारण्यात आला. यावेळी मोदी यांनी आपण सर्जिकल स्ट्राईकच्या राजकीय मुदद्दा बनविण्य़ाविरोधात असल्याचे स्पष्ट केले. यावेळी त्यांनी सर्जिकल स्ट्राईकवेळी लाईव्ह संपर्कात असल्याची कबुली दिली.
#WATCH Prime Minister Narendra Modi recounts the series of events during surgical strike after Uri attack. #PMtoANIpic.twitter.com/M79iBF8ZzO
— ANI (@ANI) January 1, 2019
उरी सेक्टरमध्ये हल्ला झाल्यानंतर केरळमध्ये असताना मी स्वताला काबूत ठेवू शकत नव्हतो. लष्कराला पाकिस्तानमध्ये घुसून धडा शिकवायचा होता. यामुळे त्यांच्याकडे या ऑपरेशनबाबतचा धोका सांगितला आणि निर्णयही त्यांच्यावर सोपवला. भारतीय लष्कर तयार झाले. तुकड्यांसाठी जवानही निवडले गेले. यामध्ये वेळ गेला. सर्जिकल स्ट्राईकच्यावेळी मी जवानांच्या संपर्कात होतो. मात्र, पहाटे त्यांच्याकडून तासभर कोणतीच माहिती आली नाही. यामुळे बेचैन झालो होतो. कारण ऑपरेशनवेळी जवानांना काही झाले तर नाही ना, याची काळजी लागली होती. मात्र, आम्ही सुखरूप भारतीय हद्दीत आल्याचे जवानांनी सांगितले आणि धीर आल्याचे मोदी यांनी सांगितले. तसेच यामुळे जवानांची क्षमता कळल्याचे मोदी म्हणाले.
पाकिस्तानला सांगितल्याशिवाय कोणालाही सांगणे उचित नव्हते. यामुळे मिडियाला जेव्हा बोलविण्यात आले तेव्हा मिडियामध्येही खळबळ उडाली होती. पाकिस्तान तर फोनच उचलत नव्हता. मी काय घोषणा करणार याबाबत मिडियाही संभ्रमात होती, असेही मोदी यांनी सांगितले.