किटकनाशक परवाना शुल्कात अनेक पटींनी वाढ जि.प.तर्फे निर्देश जारी : ग्रामीणसाठी ६० वरून १५०० तर शहरी भागासाठी ३०० वरून ७५०० शुल्क

By admin | Published: April 14, 2016 12:54 AM2016-04-14T00:54:00+5:302016-04-14T00:54:00+5:30

जळगाव- किटकनाशके विक्रीसंबंधी आवश्यक परवाना शुल्कामध्ये शासनाने अनेक पटींनी वाढ केली आहे. त्यासंबंधीचे पत्र मंगळवारी जिल्हा परिषदेच्या कृषि विभागाला प्राप्त झाले. त्यानुसार नवीन शुल्काची माहिती किंवा परिपत्रक कृषि विभागाने जारी केले आहे.

Directives issued by GPP for multiplication of pesticide license fee: From 60 to 1500 for rural and 300 to 7500 for urban areas | किटकनाशक परवाना शुल्कात अनेक पटींनी वाढ जि.प.तर्फे निर्देश जारी : ग्रामीणसाठी ६० वरून १५०० तर शहरी भागासाठी ३०० वरून ७५०० शुल्क

किटकनाशक परवाना शुल्कात अनेक पटींनी वाढ जि.प.तर्फे निर्देश जारी : ग्रामीणसाठी ६० वरून १५०० तर शहरी भागासाठी ३०० वरून ७५०० शुल्क

Next
गाव- किटकनाशके विक्रीसंबंधी आवश्यक परवाना शुल्कामध्ये शासनाने अनेक पटींनी वाढ केली आहे. त्यासंबंधीचे पत्र मंगळवारी जिल्हा परिषदेच्या कृषि विभागाला प्राप्त झाले. त्यानुसार नवीन शुल्काची माहिती किंवा परिपत्रक कृषि विभागाने जारी केले आहे.

पूर्वी ग्रामीण भागात किटकनाशके विक्रीसंबंधीच्या परवान्यासाठी ६० रुपये शुल्क होते. ते आता १५०० रुपये असेल. तर शहरी भागासाठी हे शुल्क ३०० रुपये एवढे होते. त्यात मोठी वाढ झाली असून, ते आता सात हजार ५०० रुपये एवढे असणार आहे. दोन वर्षांसाठी हे नवीन शुल्क लागू करण्यात आले आहे.

शासनाने या शुल्कात २०११ मध्ये वाढ केली होती. परंतु त्याविरोधात विक्रेते काही संस्था न्यायालयात गेल्या होत्या. न्यायालयाने शासनाच्या बाजूने निकाल दिला असून, त्यानुसार हे शुल्क वाढले आहे, अशी माहिती कृषि विकास अधिकारी मधुकर चौधरी यांनी दिली.

जिल्हाभरात किटकनाशके विक्री करणार्‍या पाच हजार पेक्षा अधिक व्यक्तींनी परवाने काढले आहेत. परवाना नूतनीकरण करताना नवीन निर्देशानुसार शुल्क भरावे लागेल. यानंतर परवाना मिळणार आहे.

Web Title: Directives issued by GPP for multiplication of pesticide license fee: From 60 to 1500 for rural and 300 to 7500 for urban areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.