दिग्दर्शक रवी चोप्रा यांचे निधन

By admin | Published: November 12, 2014 05:44 PM2014-11-12T17:44:54+5:302014-11-12T17:44:54+5:30

बॉलीवूडमधील निर्माते आणि दिग्दर्शक रवी चोप्रा यांचे बुधवारी दुपारी ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झाले. ते ६८ वर्षांचे होते.

Director Ravi Chopra passes away | दिग्दर्शक रवी चोप्रा यांचे निधन

दिग्दर्शक रवी चोप्रा यांचे निधन

Next

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. १२ - बॉलीवूडमधील निर्माते आणि दिग्दर्शक रवी चोप्रा यांचे बुधवारी दुपारी ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झाले. ते ६८ वर्षांचे होते. चोप्रा यांनी बागबान, द बर्निंग ट्रेन, बाबूल अशा चित्रपटांचे दिग्दर्शन केले होते. तर छोट्या पडद्यावरील महाभारत आणि रामायण या मालिकांमुळे रवी चोप्रा प्रसिद्धीच्या झोतात आले होते. 
दिवंगत सिने निर्माते आणि दिग्दर्शक बी.आर. चोप्रा यांचे पुत्र रवी चोप्रा यांना गेल्या नऊ वर्षांपासून फुफ्फुसाच्या आजाराने ग्रासले होते. मंगळवारी दुपारी प्रकृती खालावल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात भरती करण्यात आले. मात्र आज दुपारी तीनच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. रवी चोप्रा यांनी निर्मिती केलेले भूतनाथ रिटर्न्स हा त्यांचा नुकताच प्रदर्शित झालेला सिनेमा होता. 

Web Title: Director Ravi Chopra passes away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.