िििि

By admin | Published: February 14, 2015 11:51 PM2015-02-14T23:51:17+5:302015-02-14T23:51:17+5:30

श्रीरामवूर दि. ०४ (वार्ताहर) : येथील बांधकाम व्यवसायातील सुप्रसिध्द उद्योजक नगरसेवक श्रीनिवास बिहाणी व वैभव केशरचंद लोढा या दोघांनी नगरपालिकेला एक स्वर्गरथ अद्यावत वाहन देवुन एक सेवाचा नवा उपक्रम केला आहे.

Dirt | िििि

िििि

Next
रीरामवूर दि. ०४ (वार्ताहर) : येथील बांधकाम व्यवसायातील सुप्रसिध्द उद्योजक नगरसेवक श्रीनिवास बिहाणी व वैभव केशरचंद लोढा या दोघांनी नगरपालिकेला एक स्वर्गरथ अद्यावत वाहन देवुन एक सेवाचा नवा उपक्रम केला आहे.
श्रीरामपूर शहराचा विस्तार चारी दिशेला अमरधामपासुन सुमारे ३-४ कि.मी. चा झाला आहे. भारतीय संस्कृती प्रमाणे अंतविधीसाठी मृतदेह अमरधाम पर्यंत खांद्यावर आणणे हे शक्य होत नाही. याचा विचार करुन मुंबई पुणे व मोठ्या शहराचेमध्ये स्वर्गरथ वाहन चालविले जाते. त्या धर्तीवर श्रीनिवास बिहाणी व वैभव लोढा या उद्योजकांनी या शहरांना भेट देवुन स्वर्गरथ वाहनाची पाहणी करुन त्याच धर्तीवर श्रीरामपूरच्या नगरपालिकेला स्वर्गरथ देण्याच्या संकल्पनातुन एक टाटा कंपनीच्या गाडीवर अद्यावत स्वर्गरथ बनविलेले वाहन नागरिकांच्या सेवेसाठी अर्पण केले आहे.
श्रीनिवास बिहाणी यांनी आपले पिताश्री स्व. लक्ष्मीनारायण बिहाणी व वैभव लोढा यांनी आपले पिताश्री स्व. केशरचंद लोढा यांचे स्मृती प्रित्यर्थ स्वर्गरथ नगरपालिकेला प्रदान केला. या स्वर्गरथाच्या चाव्या प्रातांधिकारी प्रकाश थवील व माजी आमदार जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष जयंतराव ससाणे यांचे उपस्थितीमध्ये नगराध्यक्षा सौ. राजश्री ससाणे व नुतन उपनगराध्यक्ष अंजुमभाई शेख, मावळत्या उपनगराध्यक्षा सौ. कांचन सानप यांच्याकडे सुपुर्त केल्या.
यावेळी पक्षप्रतोद संजय फंड, नगरसेवक संजय छल्लारे, अमोल धनवटे, कल्याण कुंकूलोळ, आण्णासाहेब डावखर, राजेंद्र महांकाळे, संगिता मंडलीक, सचिन गुजर, जी. के. पाटील, दत्तात्रय धालपे, कलमी कुरेशी, मुन्ना पठाण आदि मान्यवर उपस्थित होते. जयंतराव ससाणे यांनी श्रीनिवास बिहाणी व वैभव लोढा यांच्या सेवेचा गौरव केला.
चौकट : श्रीनिवास बिहणी व वैभव लोढा हे बांधकाम व्यवसाय भागिदारीत श्रीरामपूरला करता करता एकमेकाचे बंधु अशी जोडी सर्वत्र परिचीत झाली. आम्हांला व्यवसायातुन परमेश्वर कृपेने लाभ होतो. या लाभातुन समातचे देणे लागतो या भावनेतुन समाजासाठी सेवा करण्याचा आशिर्वाद परमेश्वराचा असल्यामुळे हे कार्य आम्ही करीत आहोत. दु:खी माणसांना मदत करणे या उद्देशाने आम्ही प्रयत्न करीत असल्याची भावना व्यक्त केली.

फोटो कॅप्शन : नगराध्यक्षा सौ. राजश्री ससोण यांच्याकडे माजी आमदार जयंतराव ससाणे यांच्या हस्ते स्वर्गरथ नगरसेवक श्रीनिवास बिहाणी व उद्योजक वैभव लोढा यांनी पालिकेस भेट दिला. उपनगराध्यक्ष अंजुमभाई शेख, प्रातांधिकारी प्रकाश थवील, मुख्याधिकारी संतोष खांडेकर आदि उपस्थित होते.

Web Title: Dirt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.