‘अपंग मूल असलेल्यांची बदली नको’
By Admin | Published: June 11, 2014 01:17 AM2014-06-11T01:17:47+5:302014-06-11T01:17:47+5:30
नियमित बदलीतून सवलत देण्यात यावी आणि बदलीच्या ठिकाणी जाण्यास नकार देणा:यांना स्वेच्छानिवृत्ती घेण्यास सांगण्यात येऊ नये, असे केंद्र सरकारने बजावले आहे
>नवी दिल्ली : अपंग मूल असलेल्या सरकारी कर्मचा:यांना पाल्याची काळजी घेण्यासाठी नियमित बदलीतून सवलत देण्यात यावी आणि बदलीच्या ठिकाणी जाण्यास नकार देणा:यांना स्वेच्छानिवृत्ती घेण्यास सांगण्यात येऊ नये, असे केंद्र सरकारने बजावले आहे.
अपंग मूल असलेल्या कर्मचा:याला पाल्याची काळजी घेणारा प्रमुख समजण्यात यावे. अशा कर्मचा:याची बदली झाल्यास नवीन वातावरण आणि अन्य बाबींमुळे त्याच्या पाल्याच्या आरोग्यसुविधांमध्ये बाधा निर्माण होऊ शकते. तेव्हा अपंग मूल असलेल्या कर्मचा:याला नियमित बदलीतून सवलत दिल्या जाऊ शकते किंवा रोटेशनल ट्रान्स्फर प्रशासकीय बाबींवर अवलंबून राहील, असे कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाच्या आदेशात म्हटले आहे.
‘अपंग’ या शब्दामध्ये आंधळेपणा किंवा अल्पदृष्टी, बहिरेपणा, पंगुत्व किंवा सेरेब्रल पाल्सी, कुष्ठरोग, मतिमंद, मानसिक आजार आणि बहुअपंगत्व आदींचा समावेश आहे. अपंग मुलाच्या आरोग्यसुविधा आणि अन्य आवश्यक बाबींची पूर्तता करण्यासाठी आर्थिक पाठबळ गरजेचे असते. अशा परिस्थितीत नियमित बदली आणि रोटेशनल ट्रान्स्फरच्या बहाण्याने स्वेच्छानिवृत्ती घेण्यास भाग पाडल्यास अपंग मुलाच्या आरोग्यसुविधांवर परिणाम पडू शकतो, असे या आदेशात म्हटले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)