यशस्वी होण्यासाठी शिस्त महत्वाची - नरेंद्र मोदी
By admin | Published: February 28, 2016 11:46 AM2016-02-28T11:46:10+5:302016-02-28T11:49:34+5:30
शिस्तीमुळे यशाची भक्कम इमारत उभी रहाते असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या महिन्याच्या मन की बात'मध्ये विद्यार्थ्यांना परिक्षेसंबंधी मार्गदर्शन केले.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २८ - आयुष्यात यशस्वी होण्यासाठी शिस्त सर्वात महत्वाची आहे, शिस्तीमुळे यशाची भक्कम इमारत उभी रहाते असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या महिन्याच्या 'मन की बात'मध्ये विद्यार्थ्यांना परिक्षेसंबंधी मार्गदर्शन केले.
देशभरात सध्या विद्यार्थ्यांच्या शालांत परिक्षा सुरु आहेत. त्यामुळे यावेळच्या मन की बातमधून बोलताना मोदींनी विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास आणि हुरुप वाढवला.
मोदीच्या मन की बातमध्ये क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, बुध्दीबळपटू विश्वनाथन आनंद आणि शास्त्रज्ञ सीएनआर राव सहभागी झाले होते. त्यांनीही विद्यार्थ्यांना महत्वाचे सल्ले दिले.
मन कि बातमधील मुद्दे
प्रत्येक पिढीला नवे संशोधन, शोधांवर भर दिला पाहिजे, विज्ञान आणि तंत्रज्ञानाशिवाय शोध शक्य नाही - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
उद्या केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत सादर होणार असून, १२५ कोटी देशवासिय माझी परिक्षा घेणार आहेत - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
तुमच्या परिक्षा जवळ येत आहेत, पण उद्या माझी परिक्षा आहे, उद्या बजेट आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
लाईट ब्लबचा शोध लावण्यापूर्वी थॉमस एड़िसन अनेकदा अपयशी ठरले पण त्यांनी आपली मेहनत, चिकाटी आणि लक्ष्य सोडले नाही - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
या देशात भरपूर संधी आहेत, तुम्हाला काय करयाच आहे ते ठरवा, निराश होऊ नका - वैज्ञानिक सीएनआर राव यांचा मन की बातमध्ये सल्ला.
परिक्षा झाल्यावर आपण किती टक्के गुण मिळवणार त्याचे मोजमाप सुरु करतो, कृपाकरुन असे करु नका, आपण त्यापेक्षा कुटुंब आणि मित्राबरोबर वेळ घालवा आणि आराम करा - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
मी जिथे जातो तिथे लोक योगाबद्दल बोलतात, मला त्याचा आनंद होतो - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
तुमचे मन शांत असेल तर, तुम्हाला ज्ञानाचा खजिना सापडेल आणि परिक्षा तुमच्यासाठी अधिक सोपी होईल - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
आराम करा, रात्री चांगली झोप घ्या आणि भरपेट रहा मनाच्या शांततेसाठी हे आवश्यक आहे - विश्वनाथ आनंदचा मन की बात मध्ये विद्यार्थ्यांना सल्ला.
उपाशीपोट परिक्षा देऊ नका, अतिआत्मविश्वास चांगला नाही पण आत्मविश्वासही हरवू नका - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
शिस्तीमुळे यशाची भक्कम इमारत उभी रहाते - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
मी परिक्षेला बसणारे दोन प्रकारचे विद्यार्थी पाहतो जे बलास्थानावर लक्ष केंद्रीत करुन अभ्यास करतात आणि दुसरे जे स्वत:च्या क्षमतेवर शंका घेतात आणि घाबरतात - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
तुमचे पालक, शिक्षक आणि नातेवाईकांना तुमच्याकडून भरपूर अपेक्षा असतील तुम्ही तुमचे लक्ष्य निश्चित करुन ते गाठण्याचा प्रयत्न करा - सचिन तेंडुलकरचा मन कि बातमध्ये विद्यार्थ्यांना सल्ला.
मोबाईल अॅपवर आपले विचार, अनुभव सांगितल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांचे कौतुक केले.
सचिनच्या संदेशातून तुम्हाला प्रेरणा मिळेल असे वाटते - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
तुमचे लक्ष्य निर्धारित करा आणि कुठलाही दबाव न घेता ते लक्ष्य गाठण्याचा प्रयत्न करा, स्पर्धा इतरांशी नको, स्वत:शी करा - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
सकारात्मक विचार करा, सकारात्मक निकाल मिळेल - मन कि बातमध्ये सचिन तेंडुलकरचा बोर्डाच्या परिक्षा देणा-या विद्यार्थ्यांना सल्ला.
आपण मुलांच्या परिक्षेकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला तर, आपण चिंतामुक्त होऊ शकतो - पंतप्रधान नरेंद्र मोदी.