वडगावच्या बाजाराला पोलिसांकडून शिस्त
By admin | Published: February 15, 2017 07:09 PM2017-02-15T19:09:27+5:302017-02-15T20:32:16+5:30
पेठवडगाव : अखेरीस वडगावच्या बेशिस्त आठवडी बाजाराला पालिका प्रशासनाने पोलिसांच्या मदतीने शिस्त लावली. बिरदेव चौक ते आंबेडकर पुतळा या रस्त्यावर एका बाजूला बाजाराचे व्यवस्थापन केले. पांढरे पे, व्यापार्यांना ठराविक जागा, रिक्षा थांबा स्थलांतर, बेकायदेशीर रस्त्यावर पार्किंग करणार्या ५० हून अधिक दुचाकींची हवा सोडण्यात आली. प्रशिक्षणार्थी मुख्याधिकारी भुवनेश्वरी यांनी शिस्तीचा बडगा उगारून बाजाराला शिस्त आणली. त्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

वडगावच्या बाजाराचे व्यवस्थापन करण्यास व्यापार्यांचा विरोध होता. त्यामुळे व्यापारी प्रतिसाद देत नव्हते. तसेच राजकीय पाठबळ मिळत असल्यामुळे बाजारात बेशिस्त होती. यामुळे बाजारावर नागरिक, व्यापारी यांच्यातून टीका होत होती.
प्रशिक्षणार्थी मुख्याधिकारी भुवनेश्वरी यांनी आजच्या बाजाराचे व्यवस्थापन करण्याच्या सूचना बाजार व्यवस्थापन कर्मचारी, बांधकाम, आरोग्य व स्वच्छता विभागाचे कर्मचारी, बांधकाम, आरोग्य व स्वच्छता विभागाचे कर्मचारी यांना दिल्या. त्यानुसार रस्त्यावर पांढरे पे मारण्यात आले. बिरदेव चौक ते पालिका चौक या रस्त्याची पूर्व बाजू रिकामी ठेवण्यात आली. तसेच पालिका चौक ते यादव हॉस्पिटल हा निम्मा रस्ता खुला करण्यात आला.
आज, सोमवारी सकाळी व्यापार्यांना सूचना व प्रबोधन करण्यासाठी सूचना देण्यात आल्या. यामुळे बाजाराचे व्यवस्थापन सुटसुटीत झाले. सर्वच व्यापार्यांनी पालिकेने ठरवून दिलेल्या जागेत व्यवसाय सुरू केला.
बाजारात दुचाकी वाहनधारकांची गर्दी लक्षात घेऊन पार्किंगचे नियोजन वैरण बझार सरसेनापती जाधव खुले नाट्यगृह, यादव हॉस्पिटलमध्ये पे मारून करण्यात आले.