सबळ कारणाअभावी तलाक दिल्यास घालणार बहिष्कार
By admin | Published: April 16, 2017 06:07 PM2017-04-16T18:07:13+5:302017-04-16T18:07:13+5:30
कोणत्याही सबळ कारणाअभावी तलाक देता येणार नाही. शरियामध्ये सांगिलेली कारणे वगळता अन्य कारणांनी कुणी तलाक दिल्यास त्याच्यावर
Next
ऑनलाइन लोकमत
लखनौ, दि. 16 - कोणत्याही सबळ कारणाअभावी तलाक देता येणार नाही. शरियामध्ये सांगिलेली कारणे वगळता अन्य कारणांनी कुणी तलाक दिल्यास त्याच्यावर बहिष्कार घालण्यात येईल असे अखिल भारतीय मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने आज स्पष्ट केले. या प्रकरणी दोन दिवस चाललेल्या विचारविमर्षानंतर मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ट्रिपल तलाकबाबात समाजात बरेच गैरसमज आहेत. ते दूर करण्यासाठी नियम आणि कायदे बनवण्यात येतील, असेही सांगण्यात आले. मात्र ट्रिपल तलाकबाबत कायदेशीर बाबींबाबत मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने मौन बाळगले.
मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने पती-पत्नीमधील वादाबाबत नियमावली जाहीर करणार असल्याचे सांगितले. तसेच पुरुषांनी महिलांना संपत्तीमध्ये वाटा द्यावा असेही आवाहन केले. तसेच विवाहामध्ये होणारा वायफळ खर्च टाळण्याचा सल्लाही पर्सनल लॉ बोर्डाने दिला. सर्वोच्च न्यायालयात ट्रिपल तलाकबाबत सुरू असलेल्या खटल्याचा निकाल लागल्यावरच आपण त्यावर भाष्य करू, असेही याबाबत स्पष्ट करण्यात आले. तलाक देण्यात आलेल्या महिलांना हक्क देण्याबाबतही यावेळी चर्चा झाली.
सर्वोच्च न्यायालयात सध्या मुस्लिमांमधील ट्रिपल तलाकबाबत खटला सुरू आहे. मात्र धार्मिक प्रश्न असल्याने यात बाहेरील हस्तक्षेप मान्य केला जाणार नाही, असाही निर्णय मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या बैठकीत घेण्यात आला. त्याबरोबरच बाबरी अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालय जो निर्णय देईल तो मान्य केला जाईल, असेही यावेळी जाहीक करण्यात आले.
It has been decided in executive body meeting that those misusing #TripleTalaq will face social boycott: Maulana Khalid R Firangi, AIMPLB. pic.twitter.com/Uxlnbnpw6A
— ANI (@ANI_news) April 16, 2017
We will go by Supreme Court"s order on Babri-Ayodhya matter: All India Muslim Personal Law Board pic.twitter.com/w1CqIr2mFC
— ANI (@ANI_news) April 16, 2017