पेन्ह द फ्रांस ग्रामसभेत बेकायदा बांधकामांबाबत चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2015 11:31 PM2015-08-02T23:31:43+5:302015-08-02T23:31:43+5:30
पर्वरी : पेन्ह द फ्रांस पंचायतीची ग्रामसभा शांततेत झाली. ग्रामस्थांनी उपस्थित केलेल्या शंकांचे निरसन उपसरपंच स्वप्नील चोडणकर यांनी केले. ग्रामसभेत काही बेकायदा बांधकामांबाबत ग्रामस्थांनी प्रश्न उपस्थित केले. याबाबत चोडणकर यांनी अल्पावधीतच कारवाई केली जाईल, असे सांगितले. पंचायतीला पूर्णवेळ सचिव आणि तलाठी हवा अशी मागणी ग्रामस्थांनी केली. सध्या विधानसभा अधिवेशनात आमदार रोहन खंवटे यांनी मांडलेल्या ‘स्मार्ट सिटी’ योजनेत पर्वरीचा समावेश करावा, याला पाठिंबा देताना माजी सरपंच भिकू सावंत यांनी पंचायतीने यामागील आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी आग्रही मागणी केली. पणजीतील सर्व सरकारी कार्यालये पर्वरीत स्थलांतरित होत आहेत. त्यामुळे पंचायत क्षेत्रात वीज, पाणी आणि अन्य पायाभूत सुविधांवर त्याचा अतिरिक्त ताण येत आहे. पणजी शेजारील ताळगाव पंचायत क्षेत्रातील भागाचा ‘स्मार्ट सिटी’ य
Next
प ्वरी : पेन्ह द फ्रांस पंचायतीची ग्रामसभा शांततेत झाली. ग्रामस्थांनी उपस्थित केलेल्या शंकांचे निरसन उपसरपंच स्वप्नील चोडणकर यांनी केले. ग्रामसभेत काही बेकायदा बांधकामांबाबत ग्रामस्थांनी प्रश्न उपस्थित केले. याबाबत चोडणकर यांनी अल्पावधीतच कारवाई केली जाईल, असे सांगितले. पंचायतीला पूर्णवेळ सचिव आणि तलाठी हवा अशी मागणी ग्रामस्थांनी केली. सध्या विधानसभा अधिवेशनात आमदार रोहन खंवटे यांनी मांडलेल्या ‘स्मार्ट सिटी’ योजनेत पर्वरीचा समावेश करावा, याला पाठिंबा देताना माजी सरपंच भिकू सावंत यांनी पंचायतीने यामागील आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी आग्रही मागणी केली. पणजीतील सर्व सरकारी कार्यालये पर्वरीत स्थलांतरित होत आहेत. त्यामुळे पंचायत क्षेत्रात वीज, पाणी आणि अन्य पायाभूत सुविधांवर त्याचा अतिरिक्त ताण येत आहे. पणजी शेजारील ताळगाव पंचायत क्षेत्रातील भागाचा ‘स्मार्ट सिटी’ योजनेत समाविष्ट करण्याचा विचार केला जातो. मग पर्वरीचा का विचार केला जात नाही, असा सवाल त्यांनी केला. याच पर्वरीत सचिवालय संकुल, मोठमोठी सरकारी कार्यालये आहेत. काळानुरूप पर्वरीचे शहरीकरण होत आहे. त्यामुळे पर्वरीचा ‘स्मार्ट सिटी’ योजनेत समावेश होणे आवश्यक आहे. नपेक्षा पर्वरीत यापुढे सरकारी कार्यालयांना ना हरकत दाखला देऊ नये, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. यावेळी मालीम जेटीनजिकचा कचरा, नादुरु स्त बोटी स्थलांतरित करणे, रस्ते, बाग व्यवस्थापन आणि गटारांची अवस्था याबाबत चर्चा झाली.सचिव लेन्सी ज्युलिओ यांनी इतिवृत्त वाचून त्यास मंजूरी मिळवली. गट विकास अधिकारी केशव राव यांनी ग्रामसभेचे कामकाज पाहून समाधान व्यक्त केले. यावेळी उपसरपंच स्वप्नील चोडणकर, राधिका सावंत, ब्लांच डिसोझा, गजानन हळर्णकर, दीपाली वेर्णेकर, सफर फडते, घनश्याम नाईक, सुभाष कळंगुटकर आणि जिल्हा पंचायत सदस्य गुपेश नाईक उपस्थित होते. (प्रतिनिधी)फोटो ओळी-ग्रामस्थांना उत्तर देताना उपसरपंच स्वप्नील चोडणकर आणि इतर. (शेखर वायंगणकर)