जैतापूर प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी चर्चा

By admin | Published: August 7, 2015 01:20 AM2015-08-07T01:20:37+5:302015-08-07T01:20:37+5:30

जैतापूर अणु प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यासाठी योग्य असा व्यावसायिक साचा शोधण्यासाठी न्युक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन आॅफ इंडिया लिमिटेड आणि फ्रान्सची

Discussion for Implementation of Jaitapur Project | जैतापूर प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी चर्चा

जैतापूर प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी चर्चा

Next

नवी दिल्ली : जैतापूर अणु प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यासाठी योग्य असा व्यावसायिक साचा शोधण्यासाठी न्युक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन आॅफ इंडिया लिमिटेड आणि फ्रान्सची मेसर्स अरेवा यांच्यात चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या. चर्चेत या प्रकल्पाच्या तांत्रिक आणि व्यावसायिक मुद्यांचा समावेश होता. या चर्चांचा निष्कर्ष समोर आल्यानंतर प्रकल्प कसा राबवायचा याचा तपशील निश्चित होईल.
जैतापूर प्रकल्पामुळे विस्थापित होणाऱ्यांचे पुनर्वसन आणि त्यांची पुर्नवसाहत करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने केलेल्या कराराची अमलबजावणी सुरू आहे. ३० जून २०१५ पर्यंत २३३६ खातेदारांपैकी १७७३ प्रकल्पग्रस्त व्यक्तींनी भरपाई स्वीकारली असून १७५३ जणांनी अतिरिक्त भरपाई स्वीकारली आहे. याशिवाय ४३१ प्रकल्पग्रस्त व्यक्तिंना प्रत्येकी ५ लाख रुपये पुनर्वसन आणि पुर्नवसाहत करारातील तरतुदीनुसार थेट रोजगाराऐवजी मंजूर करण्यात आले आहेत. करारातील अन्य कामेही हाती घेण्यात आली आहेत.

Web Title: Discussion for Implementation of Jaitapur Project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.