राऊत गुप्त मोहिमेवर दिल्लीत, महाराष्ट्राबाबत लवकरच महत्त्वाच्या निर्णयाची चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2021 06:16 AM2021-07-03T06:16:52+5:302021-07-03T06:17:21+5:30
सूत्रांनी म्हटले की, ‘राऊत भाजपच्या काही ज्येष्ठ नेत्यांना भेटले. महाराष्ट्राबाबत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून लवकरच महत्त्वाचा निर्णय घेतला जाणार असल्यामुळे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या पुनर्रचनेला विलंब झाला आहे.
हरीश गुप्ता
नवी दिल्ली : महाराष्ट्रात राजकीय घडामोडी होत असताना शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व खासदार संजय राऊत यांनी गुरुवारी दिल्लीला दिलेल्या भेटीमुळे त्यांना वेगळे वळण लागले आहे. संसदेच्या स्थायी समितीची बैठक ठरलेली नसतानाही राऊत मुंबईहून दिल्लीला गेले व तेथे मुक्कामही केला. ‘तुम्ही भाजपच्या कोणत्या ज्येष्ठ नेत्याला भेटलात का?’ असे विचारल्यावर राऊत म्हणाले, ‘होय,
मी दिल्लीला आलो आहे.’
दिल्लीत कशासाठी आलात, असे विचारल्यावर त्यांनी उत्तरास नकार दिला. सूत्रांनी म्हटले की, ‘राऊत भाजपच्या काही ज्येष्ठ नेत्यांना भेटले. महाराष्ट्राबाबत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून लवकरच महत्त्वाचा निर्णय घेतला जाणार असल्यामुळे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या पुनर्रचनेला विलंब झाला आहे, अशी चर्चा येथील राजकीय वर्तुळात आहे.’ पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात थेट झालेल्या चर्चेनंतर या अफवांना वेग आला आहे. या भेटीचा तपशील समोर आलेला नाही तरी राजकीय निरीक्षक मोदी-ठाकरे भेटीचा संबंध हा भाजपचा कल हा नव्या अटी आणि शर्तींवर (ज्या दोन्ही पक्षांना मान्य आहेत अशा) शिवसेनेसोबत पुन्हा जाण्याचा आहे, असा जोडत आहेत. एकूणच सध्या नवी दिल्लीत नव्या समिकरणांची चर्चा सुरू झाली आहे.
भेटीचे गूढ कायम
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोनच दिवसांपूर्वी दिल्लीला आले होते. बाह्यत: ते पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांना भेटण्यास आले होते. ते लोकांचा समज व्हावा म्हणून. ते मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटल्याचे समजते.
भेटीचा निष्कर्ष अजून गूढ आहे. संजय राऊत दिल्लीला आले; पण पडद्यामागे काय घडत आहे याबद्दल कोणी बोलण्यास तयार नाही. परंतु, या सगळ्या घडामोडींचा संबंध हा केंद्रीय मंत्रिमंडळाच्या होऊ घातलेल्या पुनर्रचनेशी लावला गेला आहे.