पाकिस्तानशी चर्चा सुरू करावी, दोन देशांतील संबंधांचा काश्मिरींवर परिणाम - मेहबुबा मुफ्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 01:19 AM2017-09-27T01:19:12+5:302017-09-27T01:19:25+5:30
दहशतवादाने प्रभावित काश्मीरमध्ये आता शांततेचे अंकुर फुटत आहेत. त्यामुळे पाकशी चर्चा करण्याची ही योग्य वेळ आहे, असे मत जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी व्यक्त केले.
श्रीनगर : दहशतवादाने प्रभावित काश्मीरमध्ये आता शांततेचे अंकुर फुटत आहेत. त्यामुळे पाकशी चर्चा करण्याची ही योग्य वेळ आहे, असे मत जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी व्यक्त केले. भारत आणि पाकिस्तानातील तणावाला पाकिस्तान जबाबदार असल्याचे सांंगत, दोन्ही देशातील चर्चा लवकरात लवकर सुरू व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
मुफ्ती म्हणाल्या की, पंतप्रधान मोदींनी इस्लामाबादमध्ये तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांच्याशी चर्चा करून सकारात्मक पाऊल उचलले होते, पण त्यानंतर काय झाले? पठाणकोटवर हल्ला झाला आणि राज्यात अतिरेकी कारवाया वाढल्या. तथापि, आता पाकशी चर्चा करण्याची गरज आहे. या दोन देशांतील संबंधांचा काश्मीरवर थेट प्रभाव पडतो. वाजपेयी यांच्या काळातील शांतता प्रक्रिया पुढे सुरू न ठेवल्याबद्दल त्यांनी काँग्रेसवर टीका केली.
स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावरून भाषण करताना मोदी यांनी देशवासीयांना आवाहन केले होते की, त्यांनी काश्मिरातील जनतेची गळाभेट घ्यावी. याचा उल्लेख मुफ्ती यांनी केला. भाजपा नेते राम माधव म्हणाले की, सर्वांशी चर्चा करण्याची आमची तयारी आहे. पंतप्रधान मोदी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमात पुन्हा एकदा सरोवर स्वच्छ करणारा तरुण बिलाल डार याचा उल्लेख केला होता. काश्मीरमध्ये या बातम्या पहिल्या पानावर छापून आल्या. सोशल मीडियातही याची खूप चर्चा झाली. (वृत्तसंस्था)
सैन्यात सहभागी हजारो काश्मिरींबाबत काही बोलले जात नाही
मुफ्ती म्हणाल्या की, काश्मिरातील लोक शांततेच्या पुनरागमनाची प्रतीक्षा करत आहेत. शांततेचे अंकुर आता फुटत आहेत. आता त्याला सिंचन आणि देखभालीची गरज आहे. मला विश्वास आहे की, शांततेची फळे निश्चित येतील.
मेहबुबा यांनी इलेक्ट्रॉनिक मीडियावर टीका केली. काश्मीरमध्ये हिंसाचाराची छोटीशी घटनाही राष्ट्रीय घटना म्हणून दाखवितात आणि अशा प्रकारे दाखविले जाते की, जणू काही पूर्ण काश्मीर जळत आहे.
काश्मीर खोºयातील ७० लाख लोकांना अतिरेक्यांचे समर्थक दाखविणे चुकीचे आहे. वस्तुत: केवळ २०० ते ३०० स्थानिक अतिरेकी आहेत, पण भारतीय सैन्यात सहभागी हजारो काश्मिरींबाबत काही बोलले जात नाही.
अतिरेक्याचा खात्मा
उत्तर काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर सैन्याने मंगळवारी अतिरेक्यांचा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला आणि एका अतिरेक्याला ठार मारले. एका सैन्य अधिकाºयाने सांगितले की, उरी सेक्टरमध्ये जोरावर क्षेत्रात अतिरेक्यांनी घुसखोरीचा प्रयत्न केला. घटनास्थळावरून शस्त्र जप्त करण्यात आली आहेत.
हिजबुल कमांडर ठार
दक्षिण काश्मीरच्या उरी भागात प्रत्यक्ष सीमारेषा ओलांडून भारतात घुसू पाहणारा हिजबुल मुजाहिदीनचा कमांडर, अब्दुल कय्यूम नझर याचा सुरक्षा दलांनी मंगळवारी सकाळी झालेल्या चकमकीत खात्मा केला. गेल्या काही महिन्यांना काश्मीर खोºयात हिजबुलचे अनेक म्होरके मारले गेल्यानंतर, पुन्हा जम बसविण्यासाठी पाकिस्तानमधील पाठिराख्यांनी नझरला रवाना केले होते.