मोदींची तिन्ही सैन्यदलांच्या प्रमुखांशी चर्चा

By admin | Published: September 25, 2016 03:07 AM2016-09-25T03:07:10+5:302016-09-25T03:07:10+5:30

भारताचे लष्करप्रमुख, हवाईदल प्रमुख आणि नौदल प्रमुखांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधानांच्या ७, लोक कल्याण मार्गावरील निवासस्थानी ही बैठक झाली.

Discussion of the leaders of the three armed forces | मोदींची तिन्ही सैन्यदलांच्या प्रमुखांशी चर्चा

मोदींची तिन्ही सैन्यदलांच्या प्रमुखांशी चर्चा

Next

नवी दिल्ली : भारताचे लष्करप्रमुख, हवाईदल प्रमुख आणि नौदल प्रमुखांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधानांच्या ७, लोक कल्याण मार्गावरील निवासस्थानी ही बैठक झाली. या बैठकीला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवालही उपस्थित होते.
उरीमधील दहशतवादी हल्ल्यामुळे देशात संतापाचे वातावरण असून, उरीच्या हल्लेखोरांना धडा शिकवावा अशी देशवासियांची भावना आहे. त्या पाशर््वभूमीवर पंतप्रधानांची तिन्ही सैन्य दलाच्या प्रमुखांसोबत झालेली बैठक महत्त्वपूर्ण मानली आहे.
या बैठकीत देशाच्या सुरक्षेचा आढावा घेण्यात आला. उरी हल्ल्याला जबाबदार असलेल्या एकालाही सोडणार नाही असे पंतप्रधानांनी जाहीर केले आहे. पंतप्रधानांची आज कोझीकोड येथे जाहीर सभा झाली. उरी येथे झालेल्या हल्ल्यानंतर प्रथमच पंतप्रधान मोदी यांची ही पहिली सभा होती. त्यामुळे पंतप्रधानांनी उरीच्या संदर्भात काही माहिती सैन्य दलाच्या प्रमुखांकडून घेतल्याचे सांगण्यात येते. पंतप्रधान आज पाकिस्तानबद्दल काय भूमिका घेतात याकडे देशाचे लक्ष लागले होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)

उरीमुळे देशभर संताप

उरीमधील दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देशभरात अतिशय संतापाचे वातावरण असून, हल्लेखोरांना कोणत्याही स्थितीत धडा शिकवावाच, अशी भावना आहे. त्या पाशर््वभूमीवर पंतप्रधानांची झालेली ही बैठक महत्त्वपूर्ण
होती. या बैठकीत देशाच्या सुरक्षेचा आढावा घेण्यात आला.

Web Title: Discussion of the leaders of the three armed forces

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.