बनारस विद्यापीठाच्या कुलगुरुपदी 'मराठी माणूस', औरंगाबाद ते काशीपर्यंत चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2018 03:39 PM2018-02-02T15:39:09+5:302018-02-02T15:40:19+5:30

बायोटेक्नॉलॉजीचे अभ्यासक असलेले चोपडे यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरुपदी 4 जून 2014 मध्ये नियुक्ती करण्यात आली होती. त्यांचा कार्यकाळ दीड वर्षच राहिलेला असताना त्यांना ही संधी मिळाली आहे.

Discussion from 'Marathi Manash', Aurangabad to Kashi, as Vice Chancellor of Banaras University | बनारस विद्यापीठाच्या कुलगुरुपदी 'मराठी माणूस', औरंगाबाद ते काशीपर्यंत चर्चा

बनारस विद्यापीठाच्या कुलगुरुपदी 'मराठी माणूस', औरंगाबाद ते काशीपर्यंत चर्चा

googlenewsNext

नवी दिल्ली - औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू बी. ए. चोपडे यांची प्रसिद्ध बनारस हिंदू विद्यापीठाच्या (बीएचयू) कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आली आहे. चोपडे यांच्या नियुक्तीला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंजुरी दिली आहे.  बायोटेक्नॉलॉजीचे अभ्यासक असलेले चोपडे यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरुपदी 4 जून 2014 मध्ये नियुक्ती करण्यात आली होती. त्यांचा कार्यकाळ दीड वर्षच राहिलेला असताना त्यांना ही संधी मिळाली आहे.

प्रोफेसर डॉ. बी.ए.चोपडे यांची नियुक्ती झाल्याची सोशल मीडियावर काल रात्रीपासून जोरदार चर्चा सुरु आहे. सोशल मीडियावर याबद्दल चर्वित चर्वण सुरु होते. विद्यापीठाच्या अधिकृत सुत्रांनी या वृत्ताला अद्याप दुजोरा दिलेला नाही. दुसरीकडे औरंगाबादमध्येही डॉ. चोपडे काशी विद्यापीठात जात असल्याची चर्चा आहे. 

 

गेल्यावर्षी बीएचयूमध्ये मुलींची छेडछाड झाल्याचं प्रकरण समोर आल्यानंतर विद्यार्थ्यांनी जोरदार आंदोलन केलं होतं. ही परिस्थिती हाताळण्यात बीएचयूचे कुलगुरू प्रा. जी. एस. त्रिपाठी यांना अपयश आले होते. त्यामुळे त्यांना दीर्घकालीन सुट्टीवर पाठविण्यात आले आल्याने बीएचयूमधील कुलगुरुपद रिक्त होते. त्यानंतर हे पद भरण्याची प्रक्रिया राष्ट्रपतींनी सुरू केली होती. कोणतेही आरोप नसलेले आणि पदासाठी पात्र ठरणारे कुलगुरू शोधण्याचे काम सुरू होते. त्यात अनेक पेटंट नावावर असलेल्या डॉ. चोपडे यांनी बाजी मारली आहे.

कुलगुरुंनी केला अभिनंदनाचा स्वीकार
माध्यमांनी कुलुगुरुंशी संपर्क केला असता त्यांनी अभिनंदनाचा स्वीकार केला. नियुक्ती पत्र अद्याप मिळाले नसल्याचे ते म्हणाले. पत्र मिळाल्यानंतर कुलपती सी.विद्यासागर राव यांच्याकडे राजीनामा सुपूर्द करुन वाराणसीला रवाना होणार असल्याचे डॉ. चोपडे यांनी सांगितले. अशीही चर्चा आहे की केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने प्रो. डॉ. चोपडे यांच्या नियुक्तीचे पत्र विद्यापीठाला पाठवले आहे   

Web Title: Discussion from 'Marathi Manash', Aurangabad to Kashi, as Vice Chancellor of Banaras University

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.