लष्करप्रमुख करणार अधिकाऱ्यांशी चर्चा

By admin | Published: December 28, 2014 02:09 AM2014-12-28T02:09:01+5:302014-12-28T02:09:01+5:30

आसामात एनडीएफबी(एस) बंडखोरांच्या हल्ल्यानंतर स्थितीचा आढावा घेण्यासाठी लष्करप्रमुख जनरल दलबीरसिंह सुहाग आपल्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांशी बंदद्वार रणनीतिक चर्चा करणार आहेत़

Discussion with the officers of the Army Chief | लष्करप्रमुख करणार अधिकाऱ्यांशी चर्चा

लष्करप्रमुख करणार अधिकाऱ्यांशी चर्चा

Next

गुवाहाटी/नवी दिल्ली : आसामात एनडीएफबी(एस) बंडखोरांच्या हल्ल्यानंतर स्थितीचा आढावा घेण्यासाठी लष्करप्रमुख जनरल दलबीरसिंह सुहाग आपल्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांशी बंदद्वार रणनीतिक चर्चा करणार आहेत़
एनडीएफबी (एस) बंडखोरांच्या हल्ल्यात ८१ जण मृत्युमुखी पडले आहेत़ शनिवारी लष्करप्रमुख आसामात पोहोचले़ संरक्षण प्रवक्त्याने सांगितले की, कमांडर स्थितीवर लक्ष ठेवून आहेत़ स्थितीशी निपटण्यासाठी आढावा घेतला जात आहे़
तूर्तास हिंसाचाराचे कुठलेही वृत्त नाही़ कोकराझार, चिरांग, सोनितपूर आणि उदालगुरीच्या सुमारे ७३ हजारांवर लोकांना ६१ मदत शिबिरात ठेवण्यात आले आहे़
एनआयएला चौकशीचे निर्देश
आसामच्या सोनितपूर व कोकराझार जिल्ह्यात एनडीएफबी (एस) बंडखोरांनी केलेल्या हत्याकांडप्रकरणी नोंदविण्यात आलेल्या चार प्रकरणांचा तपास करण्याचे निर्देश राष्ट्रीय तपास संस्थांना देण्यात आले आहेत़ आसाम सरकारने शुक्रवारी केंद्रास पत्र लिहून या प्रकरणांचा तपास एनआयएने करण्याची विनंती केली आहे़ यावर गृहमंत्रालयाने एनआयएला या प्रकरणांचा तपास आपल्या हाती घेण्याचे निर्देश दिले आहेत़(वृत्तसंस्था)

Web Title: Discussion with the officers of the Army Chief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.