देशाला 'वन नेशन, वन इलेक्शन'ची गरज; त्यावर गंभीर चर्चा आवश्यक- पंतप्रधान मोदी

By कुणाल गवाणकर | Published: November 26, 2020 03:37 PM2020-11-26T15:37:02+5:302020-11-26T15:37:21+5:30

देशाच्या प्रगतीसाठी 'वन नेशन, वन इलेक्शन'ची आवश्यकता; मोदींचं प्रतिपादन

discussion on one nation one election is necessary says pm narendra modi | देशाला 'वन नेशन, वन इलेक्शन'ची गरज; त्यावर गंभीर चर्चा आवश्यक- पंतप्रधान मोदी

देशाला 'वन नेशन, वन इलेक्शन'ची गरज; त्यावर गंभीर चर्चा आवश्यक- पंतप्रधान मोदी

Next

नवी दिल्ली: देशाच्या प्रगतीसाठी 'वन नेशन, वन इलेक्शन'ची गरज असल्याचा पुनरुच्चार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला आहे. आज मोदींनी अखिल भारतीय पीठासीन अधिकाऱ्यांच्या संमेलनाला संबोधित करताना मोदींनी 'वन नेशन, वन इलेक्शन'बद्दल गांभीर्यानं विचारमंथन आवश्यक असल्याचं म्हटलं. संविधान दिनाच्या पार्श्वभूमीवर मोदींनी पीठासीन अधिकाऱ्यांशी संवाद साधला.

'वन नेशन, वन इलेक्शन' केवळ विचारमंथनाचा विषय नाही. ही देशाची गरज आहे. आता आपल्याकडे काही महिन्यांनी देशात कुठे ना कुठे निवडणूक होत असतात. त्यामुळे विकासकामांमध्ये अडथळा येतो. देशाच्या प्रगतीचा वेग मंदावतो. याबद्दल आपण गांभीर्यानं विचार करायला हवा, असं मत मोदींनी मांडलं. लोकसभा, विधानसभा आणि अन्य निवडणुकांसाठी केवळ एका मतदारयादीचा वापर व्हायला हवा. आपण या मतदारयाद्यांवर पैसा आणि वेळ का खर्च करतोय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.




यावेळी पंतप्रधानांनी देशातल्या जनतेला संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या. 'संविधानाच्या निर्मितीत सहभागी असलेल्या प्रत्येक व्यक्तीचा मी आभारी आहे. डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून संविधान तयार करण्यात हातभार लावलेल्या प्रत्येकाला मी नमन करतो. त्यांच्यामुळेच देशाला संविधान मिळालं. पूज्य बापूंकडून मिळणारी प्रेरणा आणि सरदार पटेल यांची वचनबद्धता यांना प्रणाम करण्याचा आजचा दिवस आहे,' असं मोदी म्हणाले.

यावेळी त्यांनी १२ वर्षांपूर्वी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यावरही भाष्य केलं. 'आजच्याच दिवशी, १२ वर्षापूर्वी देशावर सर्वात मोठा दहशतवादी हल्ला झाला. पाकिस्तानातून आलेल्या दहशतवाद्यांनी मुंबईवर हल्ला केला. यात अनेकांचा मृत्यू झाला. परदेशातून आलेले लोक मारले गेले. त्यांना मी श्रद्धांजली वाहतो,' अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.. 

Web Title: discussion on one nation one election is necessary says pm narendra modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.