पाकिस्तानबाबतच्या रणनीतीवर चर्चा

By admin | Published: January 4, 2016 02:56 AM2016-01-04T02:56:35+5:302016-01-04T02:56:35+5:30

मैत्रीचा हात पुढे करीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेल्या आकस्मिक लाहोर भेटीला आठवडा उलटण्याच्या आत झालेल्या पठाणकोट अतिरेकी हल्ल्याने खळबळ माजली असतानाच,

Discussion on Pakistan strategy | पाकिस्तानबाबतच्या रणनीतीवर चर्चा

पाकिस्तानबाबतच्या रणनीतीवर चर्चा

Next

नवी दिल्ली : मैत्रीचा हात पुढे करीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेल्या आकस्मिक लाहोर भेटीला आठवडा उलटण्याच्या आत झालेल्या पठाणकोट अतिरेकी हल्ल्याने खळबळ माजली असतानाच, रविवारी सरकारने पाकिस्तानात काम केलेले माजी मुत्सद्दी व माजी विदेशी सचिवांना पाचारण करीत, शेजारी देशाबाबतच्या रणनीतीवर चर्चा केली. तथापि या ‘असामान्य’ बैठकीबाबत कुठलीही माहिती देणे परराष्ट्र मंत्रालयाने टाळले. ही बैठक म्हणजे केवळ पाकिस्तानबाबतच्या रणनीतीवरील कूटनैतिक चर्चा होती, केवळ एवढेच परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आले.
परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. एस.के. लांबा, जी. पार्थसारथी, श्याम सरण, शिवशंकर मेनन, सत्यब्रत पॉल, शरद सभरवाल आणि टीसीए राघवन या बैठकीत उपस्थित होते. पठाणकोट अतिरेकी हल्ल्याचा भारत-पाक चर्चेवरील संभाव्य परिणामांवरून चर्चा सुरू झाली असतानाच ही बैठक पार पडली, हे विश्ोष.
सूत्रांच्या मते, नवाज शरीफ सरकार या हल्ल्याच्या तपासात भारतीय तपास संस्थांना किती सहकार्य करते, यावर भविष्यातील भारताची रणनीती अवलंबून आहे.
अमेरिकेकडून निंदा
वॉशिंग्टन : पाकी अतिरेक्यांनी केलेल्या पठाणकोट हल्ल्याची अमेरिकेने रविवारी तीव्र शब्दांत निंदा केली. अतिरेकी नेटवर्कचा खात्मा करण्यासाठी सर्व देशांनी एकत्र येऊन कार्य करण्याचे आवाहनही अमेरिकेने केले. पठाणकोटमधील हवाई दलाच्या तळावर झालेल्या अतिरेकी हल्ल्याची अमेरिका निंदा करते. दहशतवादाविरुद्धच्या लढ्यात भारत सरकारला सहकार्य करण्यास अमेरिका कटिबद्ध आहे. अतिरेकी नेटवर्कचा खात्मा करण्यासाठी या क्षेत्रातील सर्व देशांना एकत्र येऊन काम करण्याचे आवाहन अमेरिका करते, असे अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते जॉन किर्बी म्हणाले.

Web Title: Discussion on Pakistan strategy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.