पोलीस अधिकार्‍यांची वरिष्ठांशी चर्चा जि.प.पेपरफुटी प्रकरण : अहवाल अंतिम टप्प्यात

By admin | Published: December 10, 2015 11:56 PM2015-12-10T23:56:47+5:302015-12-10T23:56:47+5:30

जळगाव- जिल्हा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या परिचर भरतीच्या पेपर फुटीप्रकरणी पोलीस तपासाधिकारी जगदीश देवरे यांनी गुरुवारी जि.प.तील वरिष्ठ अधिकार्‍यांशी चर्चा केली.

Discussion with senior police officers | पोलीस अधिकार्‍यांची वरिष्ठांशी चर्चा जि.प.पेपरफुटी प्रकरण : अहवाल अंतिम टप्प्यात

पोलीस अधिकार्‍यांची वरिष्ठांशी चर्चा जि.प.पेपरफुटी प्रकरण : अहवाल अंतिम टप्प्यात

Next
गाव- जिल्हा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या परिचर भरतीच्या पेपर फुटीप्रकरणी पोलीस तपासाधिकारी जगदीश देवरे यांनी गुरुवारी जि.प.तील वरिष्ठ अधिकार्‍यांशी चर्चा केली.
त्यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी नंदकुमार वाणी यांच्याशी चर्चा केली. या प्रकरणी ताब्यात घेतलेल्या उत्राण येथील विद्यार्थ्याच्या चारही दिशांना कोण विद्यार्थी होते, त्यांचे बैठक क्रमांक, तसेच पेपर रद्द केल्यासंबंधीच्या निर्णयाची लेखी माहिती देवरे यांनी घेतली.

समितीचा अहवाल अंतिम टप्प्यात
पेपरफुटीप्रकरणी जि.प.ने नियुक्त केलेल्या चौकशी समितीचे प्रमुख संजय मस्कर यांनी कॉपीचा प्रकार झालेल्या मिल्लत हायस्कूलमधील परीक्षा केंद्राचे प्रमुख एस.व्ही.पाटील, समावेशक तुषार माळी, भरारी पथकातील मीनल कुटे, देवीदास महाजन आदींचे जबाब घेतले आहेत. त्यांनी अहवाल तयार करण्यास सुरुवात केली आहे. तसेच या प्रकरणात पोलिसांनी केलेेल्या तपासानंतर समोर आलेली माहितीही अहवालात समाविष्ट केली जाणार आहे.

तपासाधिकारी देवरे यांनी नंतर संबंधित केंद्रात नियुक्त असलेल्या जि.प.तील कर्मचार्‍यांचेही जबाब घेतल्याचे सांगण्यात आले.
यासंदर्भात जि.प.च्या चौकशी समितीचे प्रमुख मस्कर म्हणाले की, जि.प.ने आपली चौकशी जवळपास पूर्ण केली आहे. समितीमधील सदस्यांशी चर्चा करून अहवालास अंतिम स्वरुप दिले जाईल.


पिंपळगाव आरोग्यकेंद्र प्रकरणीही जबाब
पिंपळगाव आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ.दिनेश पाटील यांच्या आत्महत्येप्रकरणी चौकशी समितीने भुसावळचे तालुका वैद्यकीय अधिकारी, आरोग्य केंद्रातील कर्मचार्‍यांचे जबाब घेतले आहे. या केंद्रातील आणखी एक कर्मचार्‍याचा जबाब घेतला जाणार असल्याची माहिती चौकशी समितीचे प्रमुख संजय मस्कर यांनी दिली.

Web Title: Discussion with senior police officers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.