चर्चेद्वारे तोडगा काढावा, संयुक्त राष्ट्रांचे भारत-पाकला आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 01:14 AM2018-01-24T01:14:43+5:302018-01-24T01:14:59+5:30
काश्मीरप्र्रश्नी मध्यस्थीची शक्यता फेटाळून लावताना भारत आणि पाकिस्तानने चर्चेद्वारे प्रलंबित मुद्द्यांवर तोडगा काढावा, असे आवाहन संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनिया गुतारेस यांनी केले आहे.
संयुक्त राष्ट्रे : काश्मीरप्र्रश्नी मध्यस्थीची शक्यता फेटाळून लावताना भारत आणि पाकिस्तानने चर्चेद्वारे प्रलंबित मुद्द्यांवर तोडगा काढावा, असे आवाहन संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनिया गुतारेस यांनी केले आहे.
गेल्या आठवड्यापासून पाकने अनेकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार केला. वातावरण तणावपूर्ण आहे. या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांचे हे विधान महत्त्वपूर्ण आहे. महासचिवांचे प्रवक्ते स्टिफन दुजार्रिक म्हणाले की, संयुक्त राष्ट्रांचे प्रमुख मध्यस्थीसाठी उपलब्ध आहेत. पण, त्यासाठी दोन्ही देशांच्या सहमती आवश्यक आहे. प्रलंबित प्रश्नांवर दोन्ही देशांनी लक्ष द्यावे यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम आम्ही करू शकतो. (वृत्तसंस्था)
१२ जणांचे गेले प्राण
भारत-पाकिस्तान सीमेवर तणाव असतानाच या आठवड्यात पाक सैनिकांनी केलेल्या गोळीबारांत १२ भारतीयांना प्राण गमवावे लागले आहेत. सीमेवरील ४० हजार रहिवाशांनी स्थलांतर केले असून सीमा भागातील १00 हून अधिक शाळाही बंद केल्या आहेत.