संविधानावर चर्चेस सरकार तयार; पुढील आठवड्यात चर्चा होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2024 05:06 AM2024-12-03T05:06:25+5:302024-12-03T05:06:47+5:30

संसदीय कामकाजमंत्री किरेन रिजिजू यांनी पत्रकारांना सांगितले की, लोकसभेत १३ आणि १४ डिसेंबर, तर राज्यसभेत १६ आणि १७ डिसेंबर रोजी संविधानावर चर्चा केली जाणार आहे.

Discussions on the constitution form the government; Discussion will be held next week | संविधानावर चर्चेस सरकार तयार; पुढील आठवड्यात चर्चा होणार

संविधानावर चर्चेस सरकार तयार; पुढील आठवड्यात चर्चा होणार

चंद्रशेखर बर्वे

नवी दिल्ली : सरकारने संसदेच्या हिवाळी अधिवेशनात संविधानावर चर्चा करण्याची तयारी दर्शविल्यामुळे विरोधी पक्षांनी आपली तलवार आज म्यान केली. पुढील आठवड्यात लोकसभा आणि राज्यसभेत संविधानावर चर्चा होणार आहे.

संसदीय कामकाजमंत्री किरेन रिजिजू यांनी पत्रकारांना सांगितले की, लोकसभेत १३ आणि १४ डिसेंबर, तर राज्यसभेत १६ आणि १७ डिसेंबर रोजी संविधानावर चर्चा केली जाणार आहे. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सोमवारी सर्वपक्षीय बैठक बोलाविली होती. यात सरकारने संविधानावर चर्चा करण्याचा प्रस्ताव मांडला आणि विरोधी पक्षांनी त्याला संमती दर्शविली.

तृणमूलची वेगळी वाट

अदानी मुद्यावर विरोधकांत एकमत नसल्याचे दिसले. तृणमूल काँग्रेसने या मुद्यावरून सोबत नसल्याचा संदेश देत ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीला दांडी मारली.

Web Title: Discussions on the constitution form the government; Discussion will be held next week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.