घातक कचऱ्याची विल्हेवाट लावणार
By admin | Published: December 28, 2015 12:22 AM2015-12-28T00:22:51+5:302015-12-28T00:22:51+5:30
१९८४ मधील भोपाळ वायूकांडाला कारणीभूत ठरलेल्या भोपाळमधील युनियन कार्बाईड कारखान्यात पडून असलेल्या विषारी कचऱ्याची सुरक्षित विल्हेवाट लावण्याच्या योजनेवर
इंदूर : १९८४ मधील भोपाळ वायूकांडाला कारणीभूत ठरलेल्या भोपाळमधील युनियन कार्बाईड कारखान्यात पडून असलेल्या विषारी कचऱ्याची सुरक्षित विल्हेवाट लावण्याच्या योजनेवर काम सुरू आहे आणि सर्व प्रकारच्या खबरदारीच्या उपाययोजना केल्यानंतरच या औद्योगिक विषारी कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात येईल, अशी ग्वाही केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी रविवारी दिली.
इंदूर येथे ‘इंदूर सायक्लोथॉन’ला हिरवी झेंडी दाखविल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, भोपाळमधील युनियन कार्बाईड कारखान्यातील विषारी कचऱ्याची विल्हेवाट लावण्याच्या योजनेवर काम सुरू आहे. कचऱ्याचा हा प्रश्न सुरक्षितरीत्या मार्गी लावण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील.