भाजप-सेना नेत्यांच्या वादात आरोग्य केंद्र रखडले
By admin | Published: February 11, 2015 12:33 AM2015-02-11T00:33:02+5:302015-02-11T00:33:02+5:30
जिल्हा परिषद : कशी मिळणार आरोग्य सेवा?
Next
ज ल्हा परिषद : कशी मिळणार आरोग्य सेवा?नागपूर : ग्रामीण भागातील लोकांना आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी लोकसंख्येच्या आधारावर प्राथमिक आरोग्य केंद्रांची निर्मिती होणे अपेक्षित आहे. परंतु भाजपचे टेकचंद सावरकर व शिवसेनेचे तापेश्वर वैद्य या दोन नेत्यांच्या वादात मौदा तालुक्यातील धानला येथील आरोग्य केंद्राचे बांधकाम मागील काही वर्षांपासून रखडल्याचे चित्र आहे.भाजप-शिवसेना यांची राज्यात व जिल्हा परिषदेत युती असली तरी, वर्चस्वासाठी सतत कुरघोडी सुरू असते. यातूनच धानला केंद्राचे बांधकाम थांबले आहे. जि.प.तील शिवसेना सदस्यांनी सुचविलेल्या कामांना मंजुरी मिळेलच, याची शाश्वती नसल्याची व्यथा शिवसेनेच्या काही सदस्यांनी मांडली. बांधकाम समितीत भाजप सदस्यांची अशीच अडवणूक करू, असा इशारा त्यांनी दिला आहे. हा वाद वाढण्याची शक्यता आहे.जि.प.मध्ये समन्वय नसल्याने जिल्ह्यातील सात प्राथमिक आरोग्य केंद्रांची कामे रखडली आहेत. यात भूगाव मेंढा, सालई गोधनी, धानला, भोरगड, झिलपा, भिष्णूर, घाटपेंढरी आदींचा समावेश आहे. तसेच नव्याने मंजूर झालेले रामपूर, बोरखेडी फाटक, इसासनी, येरला, कान्हवा आदी उपके द्रांची कामे अद्याप सुरू झालेली नाही.धानला येथील आरोग्य केंद्रासाठी जागा अधिग्रहित करण्याबाबतचा जाहीरनामा तहसीलदारांनी प्रसिद्ध केला आहे. परंतु यावर चार लोकांनी आक्षेप घेतले आहेत. सुचविलेल्या जागेचा नकाशा सादर केलेला नाही. त्यामुळे तहसीलदारांनी प्रकरण प्रलंबित ठेवले आहे.भूगाव मेंढा, सालई गोधनी व भिष्णूर आदी केंद्रांसाठी जागा उपलब्ध आहे. परंतु शासनाकडून निधी अप्राप्त असल्याने काम रखडले आहे. घाटपेंढरी, झिलपा, भोरगड व धानला आदी ठिकाणी अद्याप जागेचा प्रश्न सुटलेला नाही. (प्रतिनिधी)चौकट...१९९७ साली मंजुरीभोरगड, भिष्णूर, भूगाव व सालई गोधनी आदी प्राथमिक आरोग्य केंद्रांना शासनाने १९९७ साली मंजुरी दिली आहे. परंतु गेल्या १७ वर्षांपासून बांधकाम रखडले आहे.