झारखंड विधानसभा परिसरात नमाजसाठी स्वतंत्र खोलीने वाद
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2021 05:40 AM2021-09-07T05:40:43+5:302021-09-07T05:41:12+5:30
कामकाज सुरू झाल्यानंतरही ते गोंधळ करू लागले व ‘जय श्री राम’, ‘हर-हर महादेव’ अशा घोषणा त्यांनी दिल्या व हरे-राम, हरे कृष्णा भजन गात सरकारवर जोरदार हल्ला केला.
एस. पी. सिन्हा
रांची (झारखंड) : झारखंडविधानसभा परिसरात नमाज अदा करण्यासाठी स्वतंत्र खोली उपलब्ध करून दिल्यावरून राजकारण तापले आहे. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सोमवारी भाजप आमदारांनी ढोल व झाल वाजवत कीर्तन सुरू केले. नमाजसाठी दिलेली खोली रद्द करण्याची मागणी त्यांनी केली. कामकाज सुरू झाल्यानंतरही ते गोंधळ करू लागले व ‘जय श्री राम’, ‘हर-हर महादेव’ अशा घोषणा त्यांनी दिल्या व हरे-राम, हरे कृष्णा भजन गात सरकारवर जोरदार हल्ला केला.
निर्णय पूर्वीचाच
पिण्याचे पाणी व स्वच्छता मंत्री मिथिलेश ठाकूर म्हणाले की, “झारखंड विधानसभा भवनमध्ये पूर्वीपासूनच नमाजसाठी खोली दिली गेलेली आहे. वर्ष २००१ मध्ये बाबूलाल मरांडी मुख्यमंत्री असताना त्यांच्या सांगण्यावरून तत्कालीन विधानसभा अध्यक्ष नामधारी सिंह यांनी नमाजसाठी स्थान निर्धारित केले होते. २००७ मध्येही कक्ष दिला गेला. आता विधानसभा नव्या इमारतीत स्थानांतरित झाल्यामुळे नव्याने कक्ष दिला गेला आहे. यात चुकीचे काहीच नाही.”