वादग्रस्त न्या. सी. एस. कर्णन यांचा जामीन अर्ज फेटाळला
By admin | Published: June 21, 2017 12:08 PM2017-06-21T12:08:31+5:302017-06-21T12:08:31+5:30
सर्वोच्च न्यायालयाने न्यायालयीन अवमानाबद्दल शिक्षा ठोठावलेले कोलकाता उच्च न्यायालयाचे वादग्रस्त माजी न्यायाधीश सी. एस. कर्णन यांचा जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी फेटाळला आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 21 - सर्वोच्च न्यायालयाने न्यायालयीन अवमानाबद्दल शिक्षा ठोठावलेले कोलकाता उच्च न्यायालयाचे वादग्रस्त माजी न्यायाधीश सी. एस. कर्णन यांचा जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी फेटाळला आहे.
न्यायाधीश सी. एस. कर्णन यांना सर्वोच्च न्यायालयाने न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी सहा महिन्याच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. या सुनावणीनंतर न्यायाधीश सी. एस. कर्णन गेल्या काही दिवसांपासून फरार होते. मात्र, त्यांना मंगळवारी (दि.21) कोलकाता पोलिसांनी कोयम्बतूर येथून अटक केली. दरम्यान, त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत जामीन मिळावा आणि ठोठावण्यात आलेली शिक्षा रद्द करण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली.
न्यायाधीश सी. एस. कर्णन 12 जून रोजी फरार अवस्थेत सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्तीनंतर त्यांना बेड्या ठोकण्यात आल्याने पदावरील न्यायाधीशांच्या अटकेने होणारी न्यायव्यवस्थेची नामुष्की टळली. चेन्नई उच्च न्यायालयात असताना न्यायाधीश सी. एस. कर्णन यांनी त्याठिकाणी अनेक वाद निर्माण केल्याने त्यांची कोलकत्याला न्यायालयात बदली करण्यात आली होती. मात्र, त्याठिकाणी सुद्धा त्यांनी वादग्रस्त उक्ती व कृतीचा सपाटा सुरु ठेवल्याने सर्वोच्च न्यायालयाने अखेर त्यांच्यावर कन्टेप्ट ऑफ कोर्टचा बडगा उगारून सहा महिन्यांची शिक्षा ठोठावली होती.
सरन्यायाधीश न्या. जे. एस. केहार यांच्या नेतृत्वाखालील सात न्यायाधीशांच्या विशेष खंडपीठाने न्यायाधीश सी. एस. कर्णन यांना शिक्षा ठोठावताना दोन पानी आदेशात्मक निकाल दिला होता व सविस्तर निकालपत्र नंतर देण्याचे नमूद केले होते.
SC refused to grant interim bail to Justice (retd) CS Karnan. The Apex court also refused suspension of Karnan's 6 months jail sentence. pic.twitter.com/oWadi3gr1i
— ANI (@ANI_news) June 21, 2017
Chennai: Justice (retd) CS Karnan being taken to Kolkata by West Bengal police. pic.twitter.com/3NsNQZscdn
— ANI (@ANI_news) June 21, 2017