पाकिस्तानला झोंबणार मिरच्या, गुजरातच्या व्यापा-यांकडून भाजीपाला पुरवठा खंडीत
By admin | Published: October 8, 2016 10:57 AM2016-10-08T10:57:52+5:302016-10-08T11:00:30+5:30
भारत-पाकिस्तान सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर गुजरातमधील भाजीपाला विक्रेत्यांनी पाकिस्तानमध्ये भाजीपाला पुरवठा न करण्याचा निर्णय घेतला आहे. मिरची,टोमॅटोच्या पुरवठ्यावर व्यापा-यांनी बंदी आणली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
अहमदाबाद दि.8 - भारत-पाकिस्तान सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर गुजरातमधील भाजीपाला विक्रेत्यांनी पाकिस्तानला
भाजीपाला पुरवठा न करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेषतः मिरची आणि टोमॅटोच्या पुरवठ्यावर व्यापा-यांनी बंदी आणली आहे. यामुळे, अहमदाबादमधील भाजीपाला विक्रेत्यांना दरदिवसाच्या तीन कोटींच्या व्यापा-यावर फटका बसणार आहे, अशी माहिती अहमदाबाद जनरल कमिशन एजंट असोसिएशनचे सचिव अहमद पटेल यांनी दिली आहे. मात्र या नुकसानापेक्षा देशाचा मुद्दा महत्त्वाचे असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे. व्यापा-यांच्या या निर्णयाला शेतक-यांनीही पाठिंबा दर्शवला आहे.
आणखी बातम्या
गुजरातमधून पाकिस्तानला 50 ट्रक भरुन 10 टन इतका भाजीपाला, त्यातही विशेषतः मिरची आणि टोमॅटो पाठवला जातो. उरी हल्ल्यानंतर दोन्ही देशातील संबंध ताणले गेल्याने गेल्या दोन दिवसांपासून पाकिस्तानला भाजीपाल्याचा पुरवठा थांबवण्यात आला आहे. 1997पासून सुरू असलेला हा व्यवहार गुजरातमधील व्यापा-यांनी पहिल्यांदा थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. जोपर्यंत दोन्ही देशांमधील तणाव कमी होत नाही तोपर्यंत आम्ही भाजीपाल्याचा पुरवठा करणार नाही, अशी ठोस भूमिका व्यापा-यांनी घेतली आहे.