जिल्हा बॅँकेत वीज बिल भरण्यासाठी ग्राहकांना त्रास महावितरण : धनादेश स्वीकारण्यास नकार

By Admin | Published: January 21, 2016 12:03 AM2016-01-21T00:03:39+5:302016-01-21T00:03:39+5:30

जळगाव : चेक बाऊन्स होणे, किंवा संगणक प्रणालीत येणार्‍या तांत्रिक अडचणींचे कारण पुढे करत जिल्हा बॅँकेत वीज बिल भरण्यासाठी येणार्‍या ग्राहकांनी धनादेश दिले, तर ते स्वीकारण्यास नकार दिला जात आहे. त्यामुळे ग्राहकांची फरपट होत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

Disruption to customers for paying electricity bills in District Bank: Dismissal of checks | जिल्हा बॅँकेत वीज बिल भरण्यासाठी ग्राहकांना त्रास महावितरण : धनादेश स्वीकारण्यास नकार

जिल्हा बॅँकेत वीज बिल भरण्यासाठी ग्राहकांना त्रास महावितरण : धनादेश स्वीकारण्यास नकार

googlenewsNext
गाव : चेक बाऊन्स होणे, किंवा संगणक प्रणालीत येणार्‍या तांत्रिक अडचणींचे कारण पुढे करत जिल्हा बॅँकेत वीज बिल भरण्यासाठी येणार्‍या ग्राहकांनी धनादेश दिले, तर ते स्वीकारण्यास नकार दिला जात आहे. त्यामुळे ग्राहकांची फरपट होत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
महावितरण कंपनीने अधिकृतरीत्या सूत्र स्वीकाल्यानंतर ग्राहकाभिमुख सेवा देण्याचा गवगवा केला होता. परंतु, प्रत्यक्षात ग्राहकांना वीज बिल भरण्यासाठी जिल्हा बॅँकेच्या कुठल्याही शाखेत धनादेश दिले, तर बॅँकेतील कर्मचारी तांत्रिक अडचणीचे कारण पुढे करत आहे. धनादेशच स्वीकारण्यात येईल, असे सांगत आहे. केवळ रोख स्वरूपात ग्राहकांनी भरणा करावा, असे ग्राहकांना सांगितले जात आहे. त्यामुळे ज्या ग्राहकांना रोख स्वरूपात भरणा भरणे शक्य नाही, त्या ग्राहकांना नाहक दीक्षितवाडी येथील कार्यालयात येऊन वीज बिल भरणा करावा लागत आहे
यापूर्वीही दिली होती सूचना
याबाबत महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता एस. एस. सदामते यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले, की यापूर्वीही नागरिकांच्या तक्रारी आल्या होत्या. तेव्हा रितसर जिल्हा बॅँकेला लेखी स्वरूपात धनादेश स्वीकारण्याचे सांगितले होते.
फेबुवारीत २ नवीन भरणा केंद्र सुरू होणार
फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात शहरात दोन नवीन वीज बिल भरणा केंद्र सुरू होणार आहे. महावितरण कंपनीने ग्राहकांच्या सोयीसाठी गोलाणी मार्केट परिसरातील महावीर सहकारी बॅँक व पिंप्राळा परिसरातील तिरूपती बालाजी क्रेडीट सोसायटीशी महावितरणने करार केल्याची माहिती आहे. सद्य:स्थितीत शहरातील जिल्हा बॅँकेच्या शाखेसह सुभाष चौक अर्बन को ऑपरेटीव्ह सोसायटीच्या तीन शाखेत वीज बिल भरणा सुरू आहेत. या शाका सुभाष चौक, गणेश कॉलनी व महाबळ परिसरात आहेत. तसेच गोलाणी मार्केट मधील बुलढाणा क्रेडीट ऑपरेटीव्ह सोसायटीतही वीज बिल संकलन सुरू आहे.

कोट.................
वीज बिलासाठी ग्राहकांचे धनादेश जिल्हा बॅँकेने स्वीकारणे अपेक्षित आहे.तरीही महावितरण कंपनीतर्फे जिल्हा बॅँकेला पत्र देऊन त्याबाबत सूचना के ली जाईल.
- एस. एस. सदामते, कार्यकारी अभियंता, महावितरण कंपनी

Web Title: Disruption to customers for paying electricity bills in District Bank: Dismissal of checks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.