कलह वाढला! मुलायम यांनी अधिवेशन बेकायदेशीर ठरवून रामगोपालांची हकालपट्टी

By admin | Published: January 1, 2017 02:43 PM2017-01-01T14:43:44+5:302017-01-01T15:21:56+5:30

राजकीय वर्चस्वाच्या लढाईतून उफाळलेल्या यादवीमुळे सपमध्ये शहा काटशहाचे राजकारण जोरात आहे.

Dissatisfaction! Ramgopal's expulsion from Mulayam by making the session illegal | कलह वाढला! मुलायम यांनी अधिवेशन बेकायदेशीर ठरवून रामगोपालांची हकालपट्टी

कलह वाढला! मुलायम यांनी अधिवेशन बेकायदेशीर ठरवून रामगोपालांची हकालपट्टी

Next
 ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. 1 - राजकीय वर्चस्वाच्या लढाईतून उफाळलेल्या यादवीमुळे सपमध्ये शहा काटशहाचे राजकारण जोरात आहे.  आज सकाळी  रामगोपाल यादव यांनी बोलावलेल्या राष्ट्रीय अधिवेशनात अखिलेश यांची समाजवादी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्यानंतर आता मुलायम यांनी एक पत्रक प्रसिद्ध करून  हे  अधिवेशन बेकायदेशीर ठरवले आहे, तसेच अधिवेशन बोलावणाऱ्या रामगोपाल यादव यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. आता  पुढील वाटचाल ठरवण्यासाठी मुलायम यांनी 5 जानेवारी रोजी पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन बोलावले आहे. त्यामुळे मुलायम यांच्या समाजवादी कुटुंबात सुरू झालेला कलह अधिकच वाढला आहे. 
आज सकाळी लखनऊत झालेल्या समाजवादी पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात अखिलेश यांची सपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. तसेच शिवपाल यादव यांची पक्षाच्या उत्तर प्रदेश अध्यक्षपदावरून उचलबांगडी करतानाच अमर सिंग यांची पक्षातून हकालपट्टी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. याबाबते सर्व प्रस्ताव  रामगोपाल यांनीच अधिवेशनात मांडले होते. त्यानंतर उपस्थितांनी त्याला जोरदार अनुमोदन दिले होते.  दरम्यान, त्यामुळे संतप्त झालेल्या मुलायम यांनी रामगोपाल यांना पुन्हा एकदा पक्षातून बाहेरची वाट दाखवली. आता 5 जानेवारीला मुलायम यांनी बोलावलेल्या सपच्या राष्ट्रीय अधिवेशनाकडे सर्वांचे लक्ष असेल. 

Web Title: Dissatisfaction! Ramgopal's expulsion from Mulayam by making the session illegal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.