वृक्ष लागवड प्रक्रिया गतिमान करा जिल्हाधिकारी : यंत्रणांकडून घेतला आढावा
By admin | Published: March 23, 2017 05:17 PM2017-03-23T17:17:16+5:302017-03-23T17:17:16+5:30
जळगाव : राज्यभरात ५० कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील वृक्ष लागवड प्रक्रिया गतिमान करण्याचे आदेश जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी आढावा बैठकीत दिले.
Next
ज गाव : राज्यभरात ५० कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील वृक्ष लागवड प्रक्रिया गतिमान करण्याचे आदेश जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी आढावा बैठकीत दिले.सर्व विभागांनी रोप लागवडीची जागा अक्षांश रेखांशासह निश्चित करून खड्डे खोदण्याचे काम पूर्ण करावे, त्यानंतर रोप मागणी नोंदवून वृक्ष लागवड प्रक्रिया गतिमान करून लागवडीसाठी तयार रहावे असे आवाहन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी आढावा बैठकीत केले.५० कोटी वृक्ष लागवड अभियानाच्या अनुशंगाने जिल्हाधिकार्यांनी बुधवारी सर्व यंत्रणांचा आढावा घेतला. यावेळी विविध विभागातील अधिकारी उपस्थित होते.