गोंदे दुमाला रस्त्याची दूरवस्था

By admin | Published: July 9, 2016 11:52 PM2016-07-09T23:52:33+5:302016-07-10T01:20:10+5:30

गोंदे दुमाला रस्त्याची अवस्था बेलगाव कुर्हे: रस्ते म्हणजे विकासाची नांदी समजले जातात मात्र इगतपुरी तालुक्यातील रस्त्यांची परिस्थिती भूषणावह नक्कीच नाही. पिहल्याच पावसात अनेक रस्ते खराब झाली आहेत. मुंबई नाशिक महामार्गावरील गोंदे दुमाला येथील स्मशानभूमी परिसरापासून ते फाट्यापर्यंत रस्त्याची अवस्था अतिशय केविलवाणी झाली आहे.पंचायत समतिीच्या बांधकाम विभागाकडून हि बाब फारशी गांभीर्याने घेतली जात नाही रस्ते दुरु स्तीसाठी अन्य तालुक्यात वारेमाप खर्च होत असतांना येथे मात्र खड्डे बुजविण्याचे सौजन्य दाखिवले जात नाही. पर्यायाने आधीच त्रस्त असलेली जनता मेटाकुटीला आली आहे. वाहनधारकांना खड्ड्यात रस्ता कि रस्त्यात खड्डा यामुळे मोठी कसरत करावी लागत आहे. जीव धोक्यात घालून वाहने चालवावी चालवावी लागतात.

Distances of Gondola Dumba Road | गोंदे दुमाला रस्त्याची दूरवस्था

गोंदे दुमाला रस्त्याची दूरवस्था

Next

गोंदे दुमाला रस्त्याची अवस्था बेलगाव कुर्हे: रस्ते म्हणजे विकासाची नांदी समजले जातात मात्र इगतपुरी तालुक्यातील रस्त्यांची परिस्थिती भूषणावह नक्कीच नाही. पिहल्याच पावसात अनेक रस्ते खराब झाली आहेत. मुंबई नाशिक महामार्गावरील गोंदे दुमाला येथील स्मशानभूमी परिसरापासून ते फाट्यापर्यंत रस्त्याची अवस्था अतिशय केविलवाणी झाली आहे.पंचायत समतिीच्या बांधकाम विभागाकडून हि बाब फारशी गांभीर्याने घेतली जात नाही रस्ते दुरु स्तीसाठी अन्य तालुक्यात वारेमाप खर्च होत असतांना येथे मात्र खड्डे बुजविण्याचे सौजन्य दाखिवले जात नाही. पर्यायाने आधीच त्रस्त असलेली जनता मेटाकुटीला आली आहे. वाहनधारकांना खड्ड्यात रस्ता कि रस्त्यात खड्डा यामुळे मोठी कसरत करावी लागत आहे. जीव धोक्यात घालून वाहने चालवावी चालवावी लागतात.
तालुक्यात पावसाची संतधार सुरु असून या मुख्य रस्त्यात पाणी व गाळाचे साम्राज्य निर्माण झाल्याने वाहने चालविण्याचा अंदाज चुकल्याने अपघात होत आहे.अस्वली स्टेशन, बेलगाव कुर्हे, नांदूरवैद्य, नांदगाव बुद्रुक, साकुर, जानोरी आदी भागातील शेकडो कामगार गोंदे दुमाला येथील औद्योगिक वसाहतीमध्ये रोजनदारीसाठी याच रस्त्याने येत जात असतात. रात्री अपरात्री कामावरून या रस्त्याने प्रवास करनार्या वाहनधारकांना या रस्त्याची डोकेदुखी बनली आहे. बर्याच वेळा या रस्त्यावर छोटे मोठे अपघात देखील घडले आहेत. हा रस्ता खराब असल्याकारणाने वाहने नादुरु स्त होत आहेत. दरम्यान मुंबई नाशिक या मुख्य महामार्गाला जोडणार्या अंतर्गत रस्त्याचे काम येथील ग्रामपंचायतीने पूर्ण केले आहे मात्र पुढील अर्धवट रस्ता जिल्हा परिषद विभागात असल्याने तो अजूनही दुरु स्त केला गेला नाही. येथील ग्रामपंचायतीने वाहनधारकांची कळ कळ ओळखून तात्पुरती डागडुजी केली आहे. तालुक्याची खरी ओळख आदिवासी म्हणून पटविणार्या रस्त्या बाबत लोकप्रतिनिधीनी लक्ष देण्याची मागणी परिसरातून होत आहे.

प्रतिक्र या
विकासनिधीच्या माध्यमातून गावातील अंतर्गत सिमेंट काँक्र ीट रस्त्याचे काम प्रगतीपथावर झाले आहे मात्र पुढील स्मशानभूमिपासून गोंदे फाट्यावर जाणार्या जिल्हा परिषद विभागातील रस्त्यात खड्डे पडलेले आहेत.वाहनधारकांची व्यथा समजून आम्ही ग्रामपंचायती अंतर्गत काही खड्डे बुजविण्याचे काम केले आहे. सदर विभागाने रस्ता दुरु स्त करावा अशी अपेक्षा आहे.
गणपत जाधव, सरपंच गोंदे दुमाला
 
Web Title: Distances of Gondola Dumba Road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.