नॅब संस्थेतर्फे अंधांच्या पाल्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
By Admin | Published: July 6, 2016 09:17 PM2016-07-06T21:17:35+5:302016-07-07T00:48:28+5:30
नाशिक : नॅबतर्फे पी. एल. अपार्टमेंट, राका कॉलनी येथे अंधांच्या पाल्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून महेंद्र चोपडा, संजय चव्हाण, प्रवीण खाबिया, शशिकांत पारख, संगीता शाह, पी. सी. सुराणा, अनिल चव्हाण, रमेश पारख, शीतल सुराणा, जयप्रकाश गिरासे, जयप्रकाश कोतकर, राहुल काळे, दिलीपसिंह बेनिवाल, १०० अंधबांधव उपस्थित होते. याप्रसंगी महेंद्र चोपडा यांनी संस्थेला २१ हजार रुपये दिले व सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. प्रवीण खाबिया यांनी ११ हजार रुपये संस्थेला दिले. यावेळी मुंबईचे उद्योगपती किशोर खाबिया यांची पेटोन इन चिफ म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली. प्रास्ताविक रजनी जोशी यांनी केले. सूत्रसंचालन प्रेरणा देशपांडे यांनी केले.