रमजानसाठी गरजूंना धान्य वाटप

By admin | Published: July 10, 2015 11:13 PM2015-07-10T23:13:37+5:302015-07-10T23:13:37+5:30

सोलापूर : रमजान सणासाठी गरजू कुटुंबातील निराधार महिलांना यशदा युवती व महिला फाउंडेशनतर्फे धान्य व इतर साहित्य वाटप करण्यात आले.

Distribution of grains to the needy for Ramadan | रमजानसाठी गरजूंना धान्य वाटप

रमजानसाठी गरजूंना धान्य वाटप

Next
लापूर : रमजान सणासाठी गरजू कुटुंबातील निराधार महिलांना यशदा युवती व महिला फाउंडेशनतर्फे धान्य व इतर साहित्य वाटप करण्यात आले.
मौलाली चौक येथे आयोजित कार्यक्रमात आ. प्रणिती शिंदे यांच्या हस्ते धान्य, खाद्यतेल व इतर साहित्याचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी सभागृहनेते संजय हेमगड्डी, अल्पसंख्याक सेलचे सचिव शौकत पठाण आदी उपस्थित होते. प्रास्ताविक नगरसेविका फिरदोस पटेल यांनी केले. यशदा फाउंडेशनच्या माध्यमातून पटेल यांनी केलेले काम कौतुकास्पद आहे. केंद्रातील मोदी सरकारने केशरी शिधा पत्रिकाधारकांचे धान्य हिसकावून घेतले. त्यामुळे अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. मुस्लिमांसाठी दिलेले आरक्षण रद्द केले. हे सरकार जातीयवादी आहे, अशी टीका आ. प्रणिती शिंदे यांनी यावेळी बोलताना केली. हेमगड्डी यांचेही मार्गदर्शन झाले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वॉर्डाचे अध्यक्ष अहमद शेख, यशदा फाउंडेशनच्या मनीषा उडाणशिव, रसूल पठाण, शब्बीर पठाण, मुमताज गौर, आशा सदाफुले, रजिया जमादार, लता आव्हाड, नागेरा पठाण यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन सुमन जाधव यांनी केले तर लतीफ मल्लाबादकर यांनी आभार मानले.
000
फोटोओळी...
यशदा युवती व महिला फाउंडेशनतर्फे आयोजित कार्यक्रमात रमजान सणासाठी निराधार महिलांना धान्य व इतर साहित्याचे वाटप करताना आ. प्रणिती शिंदे, याप्रसंगी नगरसेविका फिरदोस पटेल, संजय हेमगड्डी, शौकत पठाण दिसत आहेत.

Web Title: Distribution of grains to the needy for Ramadan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.