आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील महिलांना साहित्याचे वितरण

By admin | Published: November 10, 2015 10:56 PM2015-11-10T22:56:27+5:302015-11-11T01:38:24+5:30

मूर्तिजापूर: शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील ३३ महिलांना दिवाळीनिमित्त मंगळवारी कपडे, मिठाई आणि धनादेशाचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन व साहित्याचे वितरण सार्वजनिक दशहरा उत्सव समिती आणि गजानन महाराज बहूद्देशीय संस्थेतर्फे करण्यात आले.

Distribution of literature to women in the family of suicide victims | आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील महिलांना साहित्याचे वितरण

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील महिलांना साहित्याचे वितरण

Next

मूर्तिजापूर : शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील ३३ महिलांना दिवाळीनिमित्त मंगळवारी कपडे, मिठाई आणि धनादेशाचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन व साहित्याचे वितरण सार्वजनिक दशहरा उत्सव समिती आणि गजानन महाराज बहूद्देशीय संस्थेतर्फे करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष आमदार हरिष पिंपळे होते. कार्यक्रमासाठी उद्योजक कैलास अग्रवाल यांनी सहकार्य केले. याप्रसंगी संजय गांधी योजना, कुटुंब अर्थसाहाय्य योजनेंतर्गत लाभार्थ्यांना धनादेशाचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी गजानन निपाने, तहसीलदार गजेंद्र मालठाणे, संस्थेचे उपाध्यक्ष संतोष भांडे, नगराध्यक्ष पवन अव्वलवार, माजी नगराध्यक्ष द्वारकादास दुबे, नूतन पिंपळे, सतीशचंद्र शर्मा, सुनील लच्छुवाणी, सुलभा रुईकर, नायब तहसीलदार योगेश फरताळे, ॲड. अवीन अग्रवाल, धनंजय ढोक, राजकुमार नाचणे, राजू सदार, सुरेश वरोकार, अशोक नागे, जिल्हा परिषद सदस्य रवींद्र गोपकर, हर्षल पिंपळे, पंचायत समिती सभापती शुभांगी खंडारे आदी उपस्थित होते.  

Web Title: Distribution of literature to women in the family of suicide victims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.