फक्त ६७ टक्के गणवेशांचे वितरण जि.प.त सभेत नाराजी : मुख्याध्यापकासह चार गटशिक्षणाधिकार्‍यांना नोटिसा

By admin | Published: June 19, 2016 12:16 AM2016-06-19T00:16:58+5:302016-06-19T00:16:58+5:30

जळगाव : जि.प.च्या शाळांमधील फक्त ६७ टक्के विद्यार्थ्यांना गणवेश मिळाले. उर्वरित गणवेश दिलेच नाहीत. काही शाळांमध्ये तर फक्त एक, दोन विद्यार्थ्यांना गणवेश दिले. इतर वंचित आहेत. पुस्तकांबाबतही अशीच स्थिती आहे. पहिल्या दिवशी सर्वांना गणवेश व पुस्तके द्यायला हवी होती, पण नियोजन केले नाही. आठवडाभरात १०० टक्के गणवेश व पुस्तकांचे वितरण झाले नाही तर संबंधितांवर कारवाई केली जावी, असा ठराव शनिवारी जि.प. शिक्षण समितीच्या सभेत करण्यात आला.

Distribution of only 67 percent uniforms in protest at the ZP meeting: Notices to four group teachers including headmaster | फक्त ६७ टक्के गणवेशांचे वितरण जि.प.त सभेत नाराजी : मुख्याध्यापकासह चार गटशिक्षणाधिकार्‍यांना नोटिसा

फक्त ६७ टक्के गणवेशांचे वितरण जि.प.त सभेत नाराजी : मुख्याध्यापकासह चार गटशिक्षणाधिकार्‍यांना नोटिसा

Next
गाव : जि.प.च्या शाळांमधील फक्त ६७ टक्के विद्यार्थ्यांना गणवेश मिळाले. उर्वरित गणवेश दिलेच नाहीत. काही शाळांमध्ये तर फक्त एक, दोन विद्यार्थ्यांना गणवेश दिले. इतर वंचित आहेत. पुस्तकांबाबतही अशीच स्थिती आहे. पहिल्या दिवशी सर्वांना गणवेश व पुस्तके द्यायला हवी होती, पण नियोजन केले नाही. आठवडाभरात १०० टक्के गणवेश व पुस्तकांचे वितरण झाले नाही तर संबंधितांवर कारवाई केली जावी, असा ठराव शनिवारी जि.प. शिक्षण समितीच्या सभेत करण्यात आला.
अध्यक्षस्थानी सुरेश धनके होते. सदस्य समाधान पाटील, छाया महाले, शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, देवीदास महाजन आदी उपस्थित होते.

पोहरे ता.चाळीसागाव येथील शाळेचे काम सुरू नसताना काम झाल्याचे सांगितले जाते. दुरुस्तीच झाली नाही. अधिकारी चुकीची माहिती देतात, असा आरोप छाया महाले यांनी केला. तर मुक्ताईनगरचे गटशिक्षणाधिकारी अभियंत्यासारखे वागतात व त्यांचीच कामे सभेत सांगतात. शैक्षणिक कामांवर त्यांनी लक्ष केंद्रित करावे, असे सदस्यांनी सांगितले.

पाच जणांना नोटिसा
नागलवाडी ता.चोपडा येथील शाळेची इमारत पडकी आहे. विद्यार्थी धोकादायक स्थितीत राहतात. यासंदर्भात कार्यवाही केली नाही म्हणून या शाळेचे मुख्याध्यापक आणि ग्रेडेड मुख्याध्यापकांची बिंदुनामावली सादर न केल्याने पदोन्नती प्रक्रिया लांबणीवर पडण्यासाठी कारणीभूत ठरल्याप्रकरणी जामनेर, पारोळा, यावल आणि चाळीसगाव येथील गटशिक्षणाधिकार्‍यांना नोटिसा देण्याचा निर्णय झाला.

शाळेची वेळ सकाळी करा
पावसाला चांगली सुरुवात होत नाही तोपर्यंत जि.प.च्या शाळा सकाळी सुरू कराव्यात. शालेय पोषण आहार शिजविण्याबाबतही अडचणी येत आहेत. उष्णता कायम आहे, पाणीटंचाईदेखील आहे, अशी मागणी छाया महाले व शिक्षक संघाने केली. परंतु त्याला पदाधिकार्‍यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला नाही.

Web Title: Distribution of only 67 percent uniforms in protest at the ZP meeting: Notices to four group teachers including headmaster

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.