राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कारांचं वितरण
By admin | Published: April 12, 2016 12:24 PM2016-04-12T12:24:28+5:302016-04-12T16:45:21+5:30
राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते पद्म पुरस्कार देऊन 56 दिग्गजांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये प्रियांका चोप्रा, सानिया मिर्झा, रजनीकांत, रामोजी राव, उदित नारायण यासारख्या दिग्गजांचा समावेश होता
Next
ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. १२ - राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते पद्म पुरस्कार देऊन 56 दिग्गजांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये प्रियांका चोप्रा, सानिया मिर्झा, रजनीकांत, रामोजी राव, उदित नारायण यासारख्या दिग्गजांचा समावेश होता. विशेष म्हणजे लोकमत समूहाचे फोटो एडिटर आणि ज्येष्ठ छायाचित्रकार सुधारक ओलवे यांचाही 'पद्मश्री' पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
राजधानी नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवन येथे हा सोहळा पार पडला.
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला हे पुरस्कार जाहीर करण्यात आले होते. 28 मार्चला 56 मान्यवरांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर इतर मान्यवारांना आज मंगळवारी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी पद्मविभूषण पुरस्कार स्विकारला तर अभिनेत्री प्रियांका चोप्राने पद्मश्री आणि सानिया मिर्झाने पद्मभूषण पुरस्कार स्विकारला.
President Pranab Mukherjee confers 'Padma Bhushan' on Sania Mirza at Rashtrapati Bhavan pic.twitter.com/gNOpnT2HUs
— ANI (@ANI_news) April 12, 2016
Actor Priyanka Chopra awarded Padma award by President Pranab Mukherjee at the Rashtrapati Bhavan pic.twitter.com/KHvMs7P0i3
— ANI (@ANI_news) April 12, 2016