जि.प.कनिष्ठ सहायकाला लाच घेताना रंगेहाथ पकडले
By admin | Published: June 15, 2016 11:41 PM2016-06-15T23:41:06+5:302016-06-15T23:41:06+5:30
जळगाव: मंजूर केलेल्या प्रवास भत्याच्या बिलासाठी एक हजार ९०० रुपयांची लाच स्विकारताना अशोक रामदास सोनवणे (वय ४५ रा.कनिष्ठ सहायक, यांत्रिकी उपविभाग, जि.प.जळगाव) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी पावणे पाच वाजता जिल्हा परिषदेत रंगेहाथ पकडले. तक्रारदार हे त्याच विभागात यांत्रिकी पदावर नेमणुकीस असून प्रतिनियुक्तीवर वाहन चालक म्हणून कार्यरत आहेत.
Next
ज गाव: मंजूर केलेल्या प्रवास भत्याच्या बिलासाठी एक हजार ९०० रुपयांची लाच स्विकारताना अशोक रामदास सोनवणे (वय ४५ रा.कनिष्ठ सहायक, यांत्रिकी उपविभाग, जि.प.जळगाव) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी पावणे पाच वाजता जिल्हा परिषदेत रंगेहाथ पकडले. तक्रारदार हे त्याच विभागात यांत्रिकी पदावर नेमणुकीस असून प्रतिनियुक्तीवर वाहन चालक म्हणून कार्यरत आहेत.मागील अठरा महिन्याचे प्रवास भत्ता बिल मंजूर करण्यासाठी सोनवणे यांनी तक्रारदाराकडे एक हजार ९०० रुपयांची लाच मागितली होती. मागील आठवड्यात हे बिल मंजूर होऊन रक्कमही खात्यात जमा झाली होती. तक्रारदाराने लाचेची रक्कम न दिल्याने सोनवणे यांनी पुन्हा बिल मंजुरीसाठी पाठविणार नाही असे सांगितल्याने तक्रारदाराने बुधवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार दुपारी उपअधीक्षक पराग सोनवणे यांच्या पथकाने जि.प.त सापळा लावला असता सोनवणे हे पैसे घेताना रंगेहाथ सापडले. त्यांच्याविरुध्द शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.